Jawed Habib hair Spit Controversy : हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब चक्क महिलेच्या डोक्यावर थुंकला, बघा VIDEO

By

Published : Jan 6, 2022, 5:44 PM IST

Updated : Jan 6, 2022, 6:05 PM IST

thumbnail

बागपत (उत्तरप्रदेश) - प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत ( Jawed Habib hair Spit Controversy Viral Video ) आहे. ज्यामध्ये तो एका महिलेचे केस कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे जावेद हबीबचे केस कापताना केलेले विचित्र वागणं. जावेद हबीबने चक्क डोक्यात थुंकून केस कापल्याचा आरोप महिलेने केला आहे. यासंबंधीत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, जावेद हबीब केस कापताना पाण्याऐवजी चक्क थुंकीचा वापर करत आहेत. जावेद हबीब एवढ्यावरच थांबत नाही तस असंही म्हणतो की, या थुंकीत जीव आहे. यानंतर सोशल मीडियावर जावेद हबीब याच्यावर जोरदार टीका होत आहे. दुसरीकडे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मात्र, Jawed Habib ची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

Last Updated : Jan 6, 2022, 6:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.