Pune Suicide Attempt : पुण्यात महिलेचा कॅनॉलमध्ये उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; पाहा व्हिडिओ

By

Published : Apr 4, 2022, 5:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

thumbnail

पुणे - पुण्यातील तुकाईनगर येथील कॅनॉलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. कॅनॉलमध्ये एका महिलेने उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न ( Attempted suicide by jumping into canal ) केला आहे. यावेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी त्या महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही या महिलेने पाण्यात उडी मारली त्यानंतर पोलीस हवालदार काशीद यांनी जीवाची पर्वा न करता बाहेर काढले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास पोलीस कर्मचारी कामावर असताना त्यांना एक मॅसेज मिळाला की, तुकाई नगर येथील कॅनॉलमध्ये एक महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असून तिला वाचवण्यासाठी आपली मदत हवी आहे. या कॉल नंतर लगेचच पोलीस हवलदार लक्ष्मण काशीद आणि शैलेश नेहरकर लागलीच घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी २७ वर्षांय महिलेने या कॅनॉलमध्ये उभ्या राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या ती महिला ऐकत नव्हती. फायर ब्रिगेडची मदत मिळण्याच्या आधीच त्या महिलेने पाण्यात उडी घेतली.त्यानंतर पोलीस हवालदार काशीद यांनी जीवाची पर्वा न करता बाहेर काढलं आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.