ETV Bharat / t20-world-cup-2022

Ind Vs Aus Semi Final : महिला विश्वकप सेमीफायनलसाठी कर्णधार हरमनप्रीत कौर फिट; वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकारला विश्रांती

author img

By

Published : Feb 23, 2023, 5:47 PM IST

Updated : Feb 23, 2023, 7:27 PM IST

आयसीसी महिला विश्वकप 2023 चा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा सामना आज खेळला जाणार आहे. याअगोदर भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी असल्याने, सामन्यात खेळणे आता अशक्य वाटत आहे, अशी माहिती सूत्रांकडून कळून आली आहे. अजूनही याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. दुसरीकडे, पूजा वस्त्राकर आजारपणामुळे सामन्यातून बाहेर आहे. पूजाच्या जागी स्नेह राणाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

Ind Vs Aus Semi Final
भारतीय संघासाठी मोठा धक्का; विश्वकप सेमीफायनलमधून कर्णधार हरमनप्रीत कौर बाहेर?

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपूर्वी भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि आघाडीची वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर उपांत्य फेरीच्या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी आहे आणि तिला सामन्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, तिच्या तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे संध्याकाळी तिला डिस्चार्ज देण्यात आला. तो सामना खेळणार की नाही याबाबत आयसीसीकडून सध्या कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाने अद्याप ती उपांत्य फेरीत सहभागी होऊ शकते की नाही याचा निर्णय घेतलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप असल्याचे सांगण्यात येत आहे.

गोलंदाज पूजा वस्त्राकर सेमीफायनलमधून बाहेर : दुसरीकडे भारताची वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर या सामन्यातून बाहेर आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, संसर्गाच्या तक्रारीमुळे तिला सामन्यातून बाहेर पडावे लागले. वस्त्राकरने भारताच्या सर्व गट टप्प्यांतील खेळांमध्ये भाग घेतला. या मध्यमगती गोलंदाजाने या स्पर्धेत आतापर्यंत ४४.५ च्या गोलंदाजीच्या सरासरीने २ बळी घेतले आहेत. बदली खेळाडूसाठी बीसीसीआयच्या विनंतीला आयसीसी इव्हेंट टेक्निकल कमिटीने मान्यता दिली आहे.

उपांत्य फेरीपूर्वीच भारतासाठी धोका : आयसीसीनुसार (ICC), पूजा वस्त्राकरच्या जागी ऑफ-स्पिन गोलंदाजी अष्टपैलू स्नेह राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. स्नेहने 24 टी-20सह 47 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरमनप्रीत कौरऐवजी स्मृती मंधानाला संघात कर्णधारपद दिले जाण्याची शक्यता आहे. तर हरमनप्रीतच्या जागी हरलीन देओलचा संघात समावेश केला जाऊ शकतो. उपांत्य फेरीपूर्वी भारताच्या दोन्ही स्टार खेळाडूंना संघातून वगळणे हा मोठा धक्का आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर उपांत्य फेरीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने गट १ मधील सर्व सामने जिंकून अव्वल स्थानावर कायम आहे.

भारताच्या या स्टार खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा : महिला टी-20 विश्वचषकात भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना शानदार फॉर्ममध्ये आहे. मंधानाने या स्पर्धेत 3 सामन्यांच्या 3 डावात 149 धावा केल्या आहेत. महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये स्मृती मंधाना सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये पहिला क्रमांक इंग्लंडच्या नेट सिव्हरचा आहे. तिने 4 सामन्यांच्या 4 डावात एकूण 176 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाची फलंदाज अॅलिसा हिली स्मृती मानधनाचा विक्रम मोडू शकते. 2023 च्या या स्पर्धेत, एलिसा हिलीने तीन सामन्यांमध्ये 73 च्या सरासरीने तीन डावात 146 धावा केल्या आहेत.

हेही वाचा : IND vs AUS Semifinal match : महिला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा रोखणार का विजय रथ? विश्वचषकाचा इतिहास रचण्याची आहे संधी

Last Updated : Feb 23, 2023, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.