ETV Bharat / sukhibhava

Beauty Tips : चेहऱ्यावर ताजेपणा हवा? मग झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा 'या' दोन गोष्टी

author img

By

Published : Nov 2, 2022, 4:28 PM IST

आजकाल धकाधकीच्या जीवनात चेहऱ्यावरचे तेज राहत नाही. प्रत्येकाला चेहऱ्यावर ताजेपणा हवा असतो. ग्लिसरीनमधील अनेक उत्तम गुणांमुळे याचा वापर साधारण प्रत्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये (Beauty Products) केला जातो. ग्लिसरीन (Glycerin) हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी अनुकूल आहे. खासकरून ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी. चला तर जाणून घेवूया, चेहऱ्यावर ग्लिसरीन आणि लिंबू (Lemon) लावल्याचे फायदे.

Beauty Tips
सौंदर्य टिप्स

ग्लिसरीन (Glycerin) हे असे सौंदर्य उत्पादन आहे. ज्याचा वापर त्वचेसाठी वर्षानुवर्षे केला जात आहे. चेहऱ्यावर ग्लिसरीन आणि लिंबू (Lemon) लावल्याने खूप फायदा होतो. हे चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होतो आणि चेहरा चमकदार होतो. जर तुम्हालाही बाजारातील उत्पादने चेहऱ्यावर लावायचा कंटाळा आला असेल तर चेहऱ्यावर लिंबू आणि ग्लिसरीन नक्कीच लावा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

ग्लिसरीन औषधांसारखे काम करते: ग्लिसरीन हे दिसायला पांढरे आणि घट्ट असते. तुमच्या त्वचेवर ग्लिसरीन अगदी औषधांसारखे काम करते. चेहऱ्यावरील सुरकुत्या, कोरडे चट्टे, वाढत्या वयाच्या खुणा, त्वचेचे इन्फेक्शन आणि कोणत्याही प्रकारची त्वचेसंबंधीची तक्रार असो ग्लिसरीनला पर्याय नाही. ग्लिसरीनमधील अनेक उत्तम गुणांमुळे याचा वापर साधारण प्रत्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये केला जातो. ग्लिसरीन हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी अनुकूल आहे. खासकरून ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी.

चेहऱ्यावर ग्लिसरीन आणि लिंबू लावण्याचे फायदे: ग्लिसरीन चेहरा खोलवर स्वच्छ करण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ग्लिसरीन लावल्याने मुरुमांचे डाग दूर होतात. चेहऱ्याच्या टॅनिंगसाठीही ग्लिसरीनचा वापर करता येतो. साहित्य: त्वचा चमकदार करण्यासाठी ग्लिसरीन आणि लिंबू: एक चमचे - ग्लिसरीन, 1 ते 2 थेंब- लिंबाचा रस, 1 टीस्पून - गुलाब पाणी

चेहऱ्यावर ग्लिसरीन आणि लिंबू कसे वापरावे: चेहऱ्यावर ग्लिसरीन आणि लिंबू लावल्याने चेहरा चमकदार होण्यास मदत होते. चेहरा चमकदार करण्यासाठी एक चमचा ग्लिसरीनमध्ये लिंबू आणि गुलाबपाणीचे काही थेंब मिसळा आणि चेहऱ्याला लावा. झोपण्याच्या अर्धा तास आधी लावा आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. ग्लिसरीनच्या वापराने चेहरा मॉइश्चराइज होतो आणि त्वचा चमकदार होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.