ETV Bharat / sukhibhava

Beauty Tips : सुंदर त्वचा हवी ? मग 'असा' बनवा गाजराचा फेस पॅक

author img

By

Published : Jan 2, 2023, 4:04 PM IST

सुंदर त्वचा हवी असेल तर आणि चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी महिला अनेक प्रकारचे क्रीम आणि लोशन वापरतात. पण, तरीही त्वचा निस्तेज दिसते. अशा परिस्थितीत चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी तुम्ही हिवाळ्यातील सुपरफूड 'गाजर'पासून बनवलेला फेस पॅक त्वचेवर वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया या फेस पॅकबद्दल (make carrot face pack) -

Beauty Tips
गाजराचा फेस पॅक

हैदराबाद : गाजरामध्ये असणाऱ्या कॅरोटीनॉइड्स ह्या अँटीऑक्सिडंट्समुळे प्रोस्टेट कॅन्सर, कोलन कॅन्सर, पोटाचा कॅन्सर आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. गाजर हे कंदमूळ असून यात उपयुक्त अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर असे पोषकघटक असतात. हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोटॅशियम ह्या घटकाचे प्रमाण गाजरामध्ये भरपूर असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते. यामुळे दातांचे आरोग्य देखील चांगले राहते. गाजरात व्हिटॅमिन-A (म्हणजेच बीटा कॅरोटीन), व्हिटॅमिन-K1 (फायलोक्विनोन), व्हिटॅमिन-B6, बायोटिन आणि पोटॅशियम यांचे मुबलक प्रमाण असते. यातील तंतुमय पदार्थांमुळे वजन कमी होते तसेच पोट नियमित साफ होण्यास मदत होते. असे आरोग्यासाठी गाजराचे विविध फायदे होतात.

गाजराचा फेस पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients for making carrot face pack) : गाजर - 1, हळद - 1 चिमूटभर, दही - 1 टीस्पून, बेसन - 1 टीस्पून आणि विटॅमिन-इ कॅप्सूल गाजराचा फेस पॅक अशा प्रकारे वापरा : सर्व प्रथम एका भांड्यात बेसन, हळद, उकडलेले गाजर, विटॅमिन-इ कॅप्सूल आणि दही घाला. सर्वकाही चांगले मिसळा आणि 5-10 मिनिटे चेहरा आणि मानेवर लावा. ठराविक वेळेनंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.

सुरकुत्यांसाठी काकडी आणि गाजर फेस पॅक (make carrot face pack) : साहित्य - गाजराची पेस्ट - 7-8 चमचे, काकडीची पेस्ट - 2 चमचे, बेसन - 1 टीस्पून आणि विटॅमिन-इ कॅप्सूल. हा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर आणि काकडी मिक्स करून पेस्ट तयार करा. नंतर पेस्टमध्ये बेसन - 1 टीस्पून आणि विटॅमिन-इ कॅप्सूल घाला. सर्व साहित्य चांगले मिसळा आणि 5-10 मिनिटे चेहऱ्यावर लावा. ठराविक वेळेनंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा. चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासोबतच त्वचेवरील सुरकुत्याही (Cucumber and carrot face pack for wrinkles) दूर होतील.

कोरडेपणासाठी गाजर आणि मधाचा फेस पॅक (Carrot and honey face pack for dryness) : साहित्य - गाजर - 1, लिंबाचा रस - 1 टीस्पून, मध - 2 चमचे आणि विटॅमिन-इ कॅप्सूल. सर्व प्रथम गाजरांचे लहान तुकडे करा. नंतर हे तुकडे ५ मिनिटे उकळा. उकळल्यानंतर एका भांड्यात गाजर काढून मॅश करा. मिश्रणात लिंबाचा रस, विटॅमिन-इ कॅप्सूल आणि मध घाला. सर्व साहित्य चांगले मिसळा आणि 10-15 मिनिटे चेहरा आणि मानेवर लावा. ठराविक वेळेनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.