ETV Bharat / sukhibhava

Skin care Tips for navratri 2023 : नवरात्रीच्या काळात सुंदर दिसायचे असेल तर असा करा ग्रीन टीचा वापर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 11:40 AM IST

Skin care Tips for navratri 2023
नवरात्रीच्या काळात सुंदर दिसायचे

Skin care Tips for navratri 2023 लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत, महिलांना इच्छा असते की, त्यांची त्वचा नेहमीच चमकदार राहावी. सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचा निस्तेज होते. अशा परिस्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

हैदराबाद : लवकरच सणासुदीला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत, महिलांना इच्छा असते की त्यांची त्वचा नेहमीच चमकदार राहावी. सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचा निस्तेज होते. अशा परिस्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी महिला विविध रसायनांवर आधारित सौंदर्य उत्पादनं वापरतात. मात्र, प्रत्येक वेळी अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. पण ग्रीन टी वापरून तुम्ही तुमची त्वचा चमकदार बनवू शकता. ग्रीन टी फेस पॅक घरी कसा तयार करायचा ते येथे जाणून घ्या.

ग्रीन टी फेस पॅक कसा बनवायचा:

मुलतानी माती आणि ग्रीन टी फेस पॅक : तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी मुलतानी माती खूप फायदेशीर मानली जाते. यासाठी एक चमचा मुलतानी मातीमध्ये २ चमचे ग्रीन टी टाका, नीट मिसळा आणि पेस्ट तयार करा. यानंतर, ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि किमान 15 ते 20 मिनिटे राहू द्या. ते सुकल्यावर थंड पाण्यानं धुवावे.

ऑरेंज पील आणि ग्रीन टी पॅक : यासाठी संत्र्याची साल सुकवून पावडर तयार करा. आता एक चमचा ग्रीन टीमध्ये एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर आणि अर्धा चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने धुवा.

लिंबू आणि ग्रीन टी पॅक : व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू त्वचा चमकदार बनवण्यास मदत करते. अशा परिस्थितीत त्याचा फेस पॅक तयार करण्यासाठी एक चमचा ग्रीन टी पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्याला लावा. 10 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा.

हेही वाचा :

  1. Benefits of Amla : केसांच्या प्रत्येक समस्येवर आवळा आहे रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे
  2. Viral Fever : व्हायरल तापापासून स्वत:ला वाचवायचंय? करा 'हे' घरगुती उपाय
  3. Viral Fever : व्हायरल तापापासून स्वत:ला वाचवायचंय? करा 'हे' घरगुती उपाय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.