ETV Bharat / sukhibhava

Gyan Netra: मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी लवकर दिले जाते रेमडेसिव्हिर

author img

By

Published : Nov 25, 2022, 11:37 AM IST

कोविडची लक्षणे (Symptoms of Covid) दिसू लागल्यानंतर 9 दिवसांच्या आत पीडितांना रेमडेसिव्हिर (Remdesivir) औषध दिले गेले, तर त्यांना मृत्यूच्या धोक्यापासून वाचवण्याची शक्यता (reduce the risk of death) जपानी संशोधकांनी उघड केली आहे. टोकियो मेडिकल आणि डेंटल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याचा अभ्यास केला.

Remdesivir is given early to reduce the risk of death
मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी लवकर दिले जाते रेमडेसिव्हिर

टोकियो: कोविडची लक्षणे (Symptoms of Covid) दिसू लागल्यानंतर 9 दिवसांच्या आत पीडितांना रेमडेसिव्हिर (Remdesivir) औषध दिले गेले, तर त्यांना मृत्यूच्या धोक्यापासून वाचवण्याची शक्यता (reduce the risk of death) जपानी संशोधकांनी उघड केली आहे. टोकियो मेडिकल आणि डेंटल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याचा अभ्यास केला.

रेमडेसिव्हिरमुळे मृत्यूचा धोका कमी होतो का? याबाबत कोणीही खुलासा केलेला नाही. या पार्श्वभूमीवर, जपानी संशोधकांनी 2020-21 दरम्यान आयसीयूमध्ये दाखल झालेल्या 168 कोविड पीडितांच्या आरोग्य तपशीलांचे विश्लेषण केले. संशोधक ताकेओ फुजिवारा म्हणाले, आम्हाला असे आढळून आले की, ज्यांनी लक्षणे दिसू लागल्यानंतर 9 दिवसांच्या आत रेमडेसिव्हिर घेतले त्यांच्यामध्ये मृत्यूचा धोका कमी असतो. ज्यांनी रिमडेसिव्हिर घेतले नाही आणि लक्षणे दिसू लागल्यानंतर 10 दिवसांनी औषध घेतले.

डब्ल्यूएचओनेही केल्या होत्या चाचण्या: 'या औषधाच्या कोविड - 19 च्या विविध रुग्णांवर सर्वसमावेशकपणे तीन नियंत्रित चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या कमी प्रमाणात आजारी ते गंभीर आजारी रुग्णांवर याचा परिणाम अभ्यासण्यात आला. एका अभ्यासात वेक्लरी गटाच्या औषधाने कोविड - 19 (Covid 19) दिवसांत बरा झाल्याचे समोर आले. तर, प्लेसबो गटाच्या औषधाने तो बरा होण्यास 15 दिवस लागल्याचे दिसले.

प्रतिकारशक्ती तयार होते: डब्ल्यूएचओने चार संभाव्य उपचार म्हणून महत्त्वाच्या चाचण्यांचे परिणाम तपासले. यामध्ये रेमडेसिव्हिर, हिवतापावरील औषध हायड्रोक्लोरोक्विन (विषाणूच्या प्रथिनापासून बनवलेले असल्यामुळे याच्यामुळे विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती तयार होते) तसेच, एचआयव्हीवरील उपचारांसाठी एकत्रितपणे वापरली जाणारी लोपिनाविर आणि रायटोनाविर या औषधांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

परिणाम झाला नाही: डेक्सामेथासोन या यूकेमध्ये अतिदक्षता विभागातील कोविड रुग्णांवरील उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या कमी किमतीच्या स्टिरॉइडचा या अभ्यासामध्ये समावेश नाही. वरील चार औषधांची 30 देशांमधील 500 रुग्णालयांतील 11 हजार 266 प्रौढांवर चाचणी करण्यात आली होती. या चाचण्यांनंतर त्यांचे परिणामांचे अद्याप बारकाईने पुनरावलोकन आणि समीक्षा करणे बाकी आहे. मात्र, यापैकी कोणत्याही उपचारांनी मृत्युदरावर किंवा रुग्णांना रुग्णालयात रहावे लागण्याच्या कालावधीवर फारसा परिणाम झाला नाही, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.