ETV Bharat / sukhibhava

Health tips : जाणून घ्या, रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला होईल फायदा...

author img

By

Published : Dec 8, 2022, 9:56 AM IST

अनेकदा आपल्याला रिकाम्या पोटी विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. आपण काय आणि केव्हा खातो हे तितकेच महत्त्वाचे असते. चला तर जाणून घेवूया अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता आणि कोणत्या गोष्टी खाऊ नये. (Health tips)

foods are good for health if you eat them on an empty stomach
रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला होईल फायदा...

हैदराबाद : आपल्या आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. अनेकदा आपल्याला रिकाम्या पोटी विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. आपण काय आणि केव्हा खातो हे तितकेच महत्त्वाचे असते. आपण सकाळी उठतो आणि काहीही खातो. जसे ज्यूस, अंडी, चहा, दुध, ब्रेड, इत्यादी. परंतु तुम्हाला माहित आहे का की, रिकाम्या पोटी असे काही पदार्थ खाणे हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते तसेच सकाळी हे पदार्थ खाणे खरोखरच निरोगी आहे का? चला तर जाणून घेवूया अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता आणि कोणत्या गोष्टी खाऊ नये. (Health tips)

रिकाम्या पोटी काय खाऊ नये : 1. कधीही थंड पेय किंवा थंड पाणी पिऊ नये : सकाळची सुरुवात कधीही थंड पेय किंवा थंड पाण्याने करू नये. असे केल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. (Food to avoid empty stomach)

2. रिकाम्या पोटी टॉमेटो खाऊ नका : सकाळी रिकाम्या पोटी टॉमेटो खाणे टाळा अन्यथा पोटाचे विकार, गॅस अथवा किडनी स्टोन होण्याची दाट शक्यता असते.

3. मसालेदार अन्न : मसालेदार अन्न कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. कारण मसालेदार अन्नामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते म्हणूनच सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाणे टाळा. मसालेदार अन्न गरम असल्यामुळे मुळव्यादीचा त्रास होऊ शकतो.

रिकाम्या पोटी काय खावे : 1. रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खा : यामध्ये ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेशी संबंधित आजारांमध्ये फायदा मिळतो. फायबर, ओमेगा -३ आणि ओमेगा -६ आम्लांनी युक्त बदाम नेहमी रात्रभर भिजल्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी खावेत. मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते. जेवणानंतर रक्तात वाढणारी साखरेची पातळी कमी करण्याची ताकद बदामात आहे.

2. रिकाम्या पोटी पपई खा : पपई हे उत्तम सुपर फूड आहे. आपण प्रत्येक हंगामात उपलब्ध असलेल्या पपईचा समावेश आपल्या नाश्त्यामध्ये करू शकता. हे तुमचे कोलेस्टेरॉल कमी करते आणि हृदयविकार वाढण्यापासून रोखते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रिया सुधारते. कच्ची पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी आणि फ्लूची समस्या दूर होते.

3. सुका मेवा : हिवाळ्यातील थंड वातावरणात शरीराला गरम ठेवण्यासाठी आहारात काही बदल करणे गरजेचे असतात. अशावेळी काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करण्यात येतो. थंडीमध्ये ड्रायफ्रुट्स, गुळ, शेंगदाणे, डिंक आणि सुंठ असे पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.