ETV Bharat / sukhibhava

Migraine creates Pregnancy Complications : मायग्रेनमुळे होतो गर्भधारणेवर परिणाम ?

author img

By

Published : Feb 28, 2022, 3:33 PM IST

मेरिकन अॅकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी' ( American Academy of Neurology ), ने च्या अभ्यासानुसार, मायग्रेन असलेल्या महिलांना मुदतपूर्व प्रसूती, गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब आणि प्रीक्लेम्पसियासारख्या ( preeclampsia ) गर्भधारणेच्या गुंतागुंतीचा धोका जास्त असतो.

Pregnancy Complications
Pregnancy Complications

अमेरिकन अॅकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी' ( American Academy of Neurology ), ने केलेल्या अभ्यासानुसार, मायग्रेन असलेल्या महिलांना मुदतपूर्व प्रसूती, गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब आणि प्रीक्लेम्पसियासारख्या ( preeclampsia ) गर्भधारणेच्या गुंतागुंतीचा धोका जास्त असतो. तसेच मायग्रेन असलेल्या स्त्रियांना इतरांपेक्षा प्रीक्लेम्पसियाचा धोका जास्त असू शकतो. यात डोकेदुखी, तसेच जास्त डोळे दुखणे ही लक्षणे आढळून येतात. प्रीक्लॅम्पसियामध्ये गर्भधारणेदरम्यान लघवीतील प्रथिने, तसेच उच्च रक्तदाब होण्याचा धोका असतो.

बोस्टनमधील ब्रिघम आणि महिला रुग्णालयाच्या पीएचडी, अभ्यास लेखिका अलेक्झांड्रा परड्यू-स्मिथ म्हणाल्या, "मुले जन्माला येताना 20 टक्के महिलांना मायग्रेनचा अनुभव येतो. परंतु गर्भधारणेवर मायग्रेनचा प्रभाव जाणवत नाही. यात आम्हाला मायग्रेन आणि गर्भधारणेच्या गुंतागुंतांमधील दुवे आढळून आले. डॉक्टर आणि महिलांना मायग्रेनच्या संभाव्य जोखमींबद्दल माहिती देण्यास मदत करतात. गर्भधारणेदरम्यान ( pregnancy complications) समस्यांची जाणीव असणे आवश्यक आहे." संशोधकांनी 20 वर्षांच्या कालावधीत अंदाजे 19,000 महिलांमधील 30,000 पेक्षा जास्त गर्भधारणेचा आढावा घेतला. त्यापैकी, 11 टक्के महिलांनी गर्भधारणेपूर्वी मायग्रेनचे निदान डॉक्टरांनी केले होते. 37 आठवड्यांच्या गर्भधारणेपूर्वी जन्मलेले बाळ, गर्भावस्थेतील मधुमेह, गर्भधारणेचा उच्च रक्तदाब, प्रीक्लेम्पसिया आणि कमी वजन या गोष्टी होत्या.

प्रसूतीचा धोका 17 टक्के

मायग्रेन नसलेल्या स्त्रियांच्या तुलनेत, मायग्रेन असलेल्या स्त्रियांना मुदतपूर्व प्रसूतीचा धोका 17 टक्के जास्त असतो. गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब आणि प्रीक्लेम्पसियाचा ( preeclampsia ) 40 टक्के जास्त धोका असतो. गरोदरपणातील उच्च रक्तदाबासाठी, मायग्रेन नसलेल्या महिलांमधील 5 टक्के प्रमाण होते. मायग्रेन असलेल्या महिलांमधील 7 टक्के गर्भधारणेमध्ये ही स्थिती विकसित झाली आहे. मायग्रेन असलेल्या 6 टक्के महिलांमध्ये प्रीक्लॅम्पसियाची लक्षणे आढळून आली.

प्रीक्लेम्पसिया होण्याची शक्यता

ज्या महिलांना ऑरासह आणि मायग्रेन होते, अशा 51 टक्के मायग्रेन नसलेल्या महिला गर्भधारणेदरम्यान प्रीक्लेम्पसिया होण्याची शक्यता होती. मायग्रेनचा मधुमेह किंवा कमी वजनाचा जन्माशी संबंध नाही. "यात गुंतागुंत होण्याचे धोके कमी आहेत. तरीही मायग्रेनचा असलेल्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा," असे पर्ड्यू-स्मिथ म्हणाले. "मायग्रेनबद्दल अधिक संशोधन आवश्यक आहे. मायग्रेन असलेल्या महिलांना गर्भधारणेदरम्यान निरीक्षणाचा फायदा होऊ शकतो. प्रीक्लेम्पसिया वर लवकर उपाय शोधता येईल. शक्य तितक्या लवकर ओळखल्या जाऊ शकतात आणि त्यांचे व्यवस्थापन केले जाऊ शकते."

हेही वाचा - COVID pandemic on periods : कोरोनाचा मासिक पाळीवर होतो परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.