ETV Bharat / sukhibhava

Curry leaves good for health : कढीपत्त्याचे शरीरास होतात 'हे' फायदे

author img

By

Published : Mar 23, 2022, 12:26 PM IST

कढीपत्त्यात लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 2, बी 6, बी 12, कॅल्शियम, लोह, जस्त आणि व्हॅनेडियम यांसारख्या पोषक घटक कढीपत्त्यात मुबलक प्रमाणात आढळतात. नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) ( National Center of Biotechnology Information ) (NCBI) website च्या संशोधनात, कढीपत्त्यात डायक्लोरोमेथेन, इथाइल एसीटेट आणि महानिम्बाइन हे घटक आढळतात.

Curry leaves
Curry leaves

गोड कडुलिंब ( Sweet neem ) किंवा भारतात कढीपत्ता ( Curry leaves ) हा आरोग्याचा खजिना आहे. कढीपत्ता दक्षिण भारतीय पदार्थांत वापरतात. मात्र, महाराष्ट्र आणि गुजरातसह इतर राज्यांतीलपदार्थांमध्ये देखील त्याचा वापर केला जातो. आयुर्वेदातही त्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.

कढीपत्त्यातील पोषकतत्वे

कढीपत्त्यात लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 2, बी 6, बी 12, कॅल्शियम, लोह, जस्त आणि व्हॅनेडियम यांसारख्या पोषक घटक कढीपत्त्यात मुबलक प्रमाणात आढळतात. नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) ( National Center of Biotechnology Information ) (NCBI) website च्या संशोधनात, कढीपत्त्यात डायक्लोरोमेथेन, इथाइल एसीटेट आणि महानिम्बाइन हे घटक आढळतात. याशिवाय ते अँटीऑक्सीडेटिव्ह ( antioxidative ), अँटी-अ‍ॅनिमिया आणि अँटी-डायबेटिक गुणधर्मही त्यात आढळतात.

कढीपत्त्याचे फायदे

म्हैसूर येथील पोषणतज्ञ मीनाक्षी गौडा सांगतात की कढीपत्ता बाह्य वापरासाठी देखील वापरला जातो. त्याचे काही फायदे खालीलप्रमाणे

  • शरीरात रक्ताची कमतरता असल्यास कढीपत्त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. लोहासह खनिज घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे अॅनिमियाच्या समस्येत मदत होते.
  • कढीपत्त्यात हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात. जे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्यानेही मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • डॉ. मीनाक्षी म्हणतात की कढीपत्त्यात हेपॅटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असतात. यकृताचे आरोग्य राखण्यास मदत करतात आणि हिपॅटायटीस आणि सिरोसिस सारख्या आजारांची शक्यता कमी करतात.
  • कढीपत्त्याचे सेवन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा (CVD) धोका कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. कढीपत्त्यात अँटिऑक्सीडेटिव्ह गुणधर्मामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. अँटीऑक्सीडेटिव्ह गुणधर्म शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे CVD चा धोका कमी होतो.
  • डॉ. मीनाक्षी म्हणतात की आयुर्वेदात, कढीपत्त्याचा उपयोग काही औषधी आणि तेलांमध्ये केला जातो.
  • गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांमध्ये उलट्या आणि मळमळ या समस्येमध्ये हे कार्य करते.
  • कढीपत्त्यात अँटिबायोटिक आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आढळतात. जे अनेक संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.
  • कढीपत्त्याचे नियमित सेवन वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
  • मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट्स असल्यामुळे त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत होते. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक क्रीम्स, फेसवॉश आणि इतर सौंदर्य उत्पादनांमध्ये करी लीव्हचा अर्क वापरला जातो.
  • केसांसाठी केवळ कढीपत्त्याचे सेवनच नाही तर हेअर पॅक, तेल इत्यादी स्वरूपात त्याचा बाह्य वापर खूप फायदेशीर आहे. केसांच्या उवांच्या समस्येवर उपचार करण्यास मदत करणारे शाम्पूमध्ये हे मुख्य घटक म्हणून देखील वापरले जाते.

डॉ. मीनाक्षी सांगतात की कढीपत्त्याचे सेवन सुरक्षित असले आणि त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत नाही. आरोग्य स्थितीमुळे किंवा त्याची ऍलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - Air pollution linked depression : हवेच्या प्रदूषणामुळे किशोरवयीन मुलांवर होतो परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.