ETV Bharat / sukhibhava

अश्वगंधा: तणाव दूर करणारी औषधी वनस्पती

author img

By

Published : Dec 6, 2020, 4:35 PM IST

Ashwagandha
अश्वगंधा

अश्वगंधा ही विंटर चेरी किंवा इंडीयन जिनसेंग म्हणून देखील ओळखली जाते. आरोग्यासंबंधीत विविध व्याधींवर या वनस्पतीचा उपयोग औषध म्हणून केला जातो. परंतु स्वतः याचे सेवन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हैदराबाद - निद्रानाश, तणाव, रोग प्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त आणि अ‍ॅनाबॉलिक गुणकारी औषध म्हणून अश्वगंधाची ओळख आहे. अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे. आरोग्यासंबंधीत विविध व्याधींवर या वनस्पतीचा उपयोग औषध म्हणून केला जातो. अश्वगंधा ही विंटर चेरी किंवा इंडीयन जिनसेंग म्हणून देखील ओळखली जाते. आयुर्वेदाच्या इतिहासात पीएचडी मिळवलेले आमचे तज्ज्ञ डॉ. रंगनायुकुलु यांनी याबाबत समजावून सांगताना म्हणाले की, विथनिया सोम्निफेरा (अश्वगंधा) ही सोलानासीए (Solanaceae) कुटुंबातील वनस्पती आहे. ही बारमाही वाढणारी वनस्पती आहे. औषध निर्मितीसाठी या वनस्पतीची मुळं अधिक उपयुक्त असतात. अश्वगंधा ही संपूर्ण भारतभर आढळणारी वनस्पती असून तुलनेने कोरड्या हंगामात या वनस्पतीची वाढ अधिक चांगल्याप्रकारे होते.

उपलब्धता -

डॉ. रंगनायुकुलु यांनी सांगितले की, अश्वगंधा ही वाळलेली बारीक काडी किंवा पावडरच्या स्वरुपात बाजारात कोठेही सहज उपलब्ध असते. शिवाय इतरही अन्य स्वरुपात अश्वगंधा बाजारात उपलब्ध असते. यामध्ये घृतम् (तूप), क्वठा (डेकोक्शन), अरिस्ता (अल्कोहोलची मात्रा असलेले टॉनिक), तैला (तेल), लेप (मलम), चूर्ण (पावडर), लेह्या (खाण्यायुक्त सेमीसॉलिड पदार्थ) आणि टॅब्लेट यासारखी विविध तयार उत्पादने सध्या बाजारात उपलब्ध आहेत. ही उत्पादने साधारणतः आयुर्वेदीक मेडीकल शॉपमध्ये किंवा सामान्य मेडीकल शॉपमध्येही उपलब्ध असतात.

अश्वगंधाचे फायदे -

आमच्या तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे अश्वगंधाचे काही आरोग्यदायक फायदे आहेत, ते फायदे खाली नमूद केले आहेत.

१. रिजुव्हेनेटर -

१ ते ३ ग्रॅम अश्वगंधा रूट पावडर... दूध, तूप किंवा कोमट पाण्यासोबत १५ दिवस घेतल्यास हे रिजुव्हेनेटरचे कार्य करते. त्याचबरोबर वजन वाढण्यास मदत करते.

२. किरकोळ शरीरयष्टीवर उपाय -

अश्वगंधाचा एक अंश आणि तुपाचे चार अंश शिजवून घेऊन, त्यामध्ये दुधाचे १० अंश मिसळून पिल्यास वजन वाढण्यास मदत होते.

३. इन्सोम्नीया (निद्रानाश) -

२ ते ४ ग्रॅम अश्वगंधा पावडर, साखर आणि कोमट दुधासोबत घेतल्याने निद्रानाशची समस्या दूर होते. आणि चांगली झोप येते. शिवाय चिंता, घोर आणि न्यूरोसिस सारखी लक्षणे देखील कमी होतात. अश्वगंधा ही अँटीडिप्रेससंट आणि सायकोट्रॉपिक औषधाचे कार्य करते.

४. ब्रोनकियल दमा (अस्थमा) -

अश्वगंधाची राख (अल्कली) मध आणि तूपासोबत घेणे, ब्रोनकियल दम्यासाठी खुप प्रभावी ठरते.

५. गर्भधारणेसाठी -

अश्वगंधा डेकोक्शनपासून तयार केलेले तूप आणि दुधाचे सेवन केल्याने वांझपणा जाऊ शकतो.

६. जखमा भरून निघण्यास मदत -

२ ते ४ ग्रॅम अश्वगंधा पावडर गूळ किंवा तूपासोबत घेतल्यास जखमा भरून निघण्यास मदत होते.

७. युरिन सप्रेशन -

दररोज २० मिली अश्वगंधा डेकोक्शनचे सेवन केल्याने युरिन सप्रेशनची समस्या दूर होते आणि लघवी सुलभ होण्यास मदत होते. डिहायड्रेशन, मूत्रपिंडाशी संबंधित समस्या, प्रोस्टेट वाढीमुळे युरिन सप्रेशनचा त्रास उद्भवू शकतो.

याव्यतिरिक्त डॉ. रंगनायुकुलू यांनी पुढे सांगितले की, “अश्वगंधा ही बॅक्टेरियाविरोधी, अँटीपायरेटिक (ताप कमी करते), वेदनशामक (वेदना कमी करते), दाहकविरोधी (जळजळ दूर करते), ॲन्टी कॉनव्हर्सन्ट (स्नायूंच्या हालचाली सुलभ करते), अँटी-ट्यूमर अ‍ॅक्टिव्हिटी, अशा विविध व्याधींवर उपयुक्त आहे. शिवाय विषयुक्त स्थितीत देखील अश्वगंधा महत्त्वपूर्ण ठरते.”

डोस -

आमच्या आयुर्वेदिक तज्ज्ञाने सुचवल्याप्रमाणे एक सामान्य डोस म्हणजेः

- अल्पवयीन मुलांसाठी: ५०० एमजी

- प्रौढांसाठी: १ ग्रॅम ते ३ ग्रॅम किंवा द्रव्य स्वरुपात: १० ते २० मिली

घ्यावयाची काळजी -

गर्भधारणेदरम्यान अश्वगंधा घेण्याचा सल्ला दिला जात नाही, कारण यामुळे लवकर प्रसूती होण्याची शक्यता असते. तसेच स्तनपान देणाऱ्या मातांनीही अश्वगंधा घेणे टाळले पाहिजे.

अतिरिक्त फायदे -

डॉ. रंगनायुकुलू यांनी सांगितल्याप्रमाणे अश्वगंधाचे काही विशिष्ट फायदेही आहेत, ते पुढीलप्रमाणे:

  • हे सामान्य स्थितीत शारीरीक क्षमता वाढवते.
  • चिंता, तणाव आणि नैराश्य कमी करते.
  • चांगली झोप येण्यास मदत करते.
  • कोलेस्टेरॉल कमी करते.
  • वजन वाढवण्यास मदत करते.
  • स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.
  • स्नायूंचा टोन वाढण्यास मदत.
  • कर्करोगापासून बचाव करते, ही कर्करोग प्रतिबंधक उपचार पद्धती आहे.

अशा प्रकारे, अश्वगंधा ही एक सर्वात प्रभावी आयुर्वेदिक औषध आहे. परंतु स्वतः हून औषधोपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: ज्यांना थायरॉईड ग्रंथीसंबंधित हायपर किंवा हायपो फंक्शनचा त्रास आहे, अशा लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अशा लोकांनी हे औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे, अत्यंत गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.