ETV Bharat / state

ट्रकला ओव्हरटेक करताना ट्रकनेच दिली धडक; १ जण जागीच ठार

author img

By

Published : May 21, 2019, 6:38 PM IST

हैद्राबादहून नागपूरकडे निघालेल्या ट्रकला मागुन येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करताना धडक दिली. या धडकेत एक ट्रकचालकाचा मृत्यू झाला. सतिशकुमार विद्यासागर असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. ही घटना आज राष्ट्रीय महामार्ग सातवरील वडकी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या डिगडोह फाट्याजवळ घडली.

ट्रकला ओव्हरटेक करताना ट्रकनेच दिली धडक; १ जण जागीच ठार

यवतमाळ - हैद्राबादहून नागपूरकडे निघालेल्या ट्रकला मागुन येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करताना धडक दिली. या धडकेत एक ट्रकचालकाचा मृत्यू झाला. सतिशकुमार विद्यासागर असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. ही घटना आज राष्ट्रीय महामार्ग सातवरील वडकी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या डिगडोह फाट्याजवळ घडली.


हैद्राबादहून नागपूरकडे निघालेल्या ट्रक क्रमांक (आरजे ११ जिआर ६८०५) ला मागुन येणारा ट्रक क्रमांक (टिएन ३४ एसी १३५९) ने ओव्हरटेक करताना धडक दिली. या धडकेत ट्रकचालक सतिशकुमार विदयासागर (वय ३८, मु. पोचला सेंकडू ता. सेलम, जि. गंगावली, तामीळनाडू) याचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताची माहिती किन्ही जवादे येथील साई सार्थक पेट्रोलपंपवरील कर्मचाऱ्यांनी वडकी पोलीस स्टेशनला दिली.


तेव्हा वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत गिते व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी सतिशकुमार याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:दोन ट्रक अपघात एक जागीच ठार; डिगडोह फाट्याजवळील घटनाBody:यवतमाळ : राष्ट्रीय महामार्ग सात वरील वडकी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या डिगडोह फाट्याजवळ आज हैद्राबाद कडुन नागपुर कड़े जात असणारे ट्रक क्रमांक (आरजे ११ जिआर ६८०५) ला मांगुण येणारा ट्रक क्रमांक (टिएन ३४ एसी १३५९) या ट्रकन ओव्हरटेक मारताना सामोरील ट्रकला जब्बर धडक दिली. या धडकेत धडक देणाऱ्या ट्रकचा चालक सतिशकुमार विदयासागर वय( ३८, मु. पोचला सेंकडू ता. सेलम, जि. गंगावली, तामीळनाडू) याचा जागीच मृत्यु झाला. याची माहिती किन्ही जवादे येथील साई सार्थक पेट्रोलपंप येथील कर्मच्याऱ्यानी वडकी पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर वडकी पोलिस स्टेशन ठाणेदार प्रशांत गिते व कर्मच्यारी यानी घटनास्थळ गाठून मृतक चालकाला ट्रक मधुन बाहेर काढुन शवविच्छदनेसाठी ग्रामीण रुग्नालय करंजी येथे नेण्यात आले. पुढील तपास पोलीस वडकी ठाणे करीत आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.