ETV Bharat / state

मुख्यधिकाऱ्यांनी नियम मोडणाऱ्या किराणा दुकानदारास ठोठावला वीस हजारांचा दंड

author img

By

Published : May 12, 2021, 9:09 PM IST

Updated : May 12, 2021, 10:37 PM IST

अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश असतानाही दुपारच्यावेळी किराणा दुकान उघडून ग्राहकांना किराणा देणाऱ्या एकावर दंडात्मक कारावाई करण्यात आली आहे.

दुकान
दुकान

यवतमाळ - अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे प्रशासनाने आदेश काढले आहेत. त्यानंतरही दुकाने उघडी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी देले आहेत. त्यानुसार ढाणकी शहरातील एका किराणा व्यावसायिकाला दुकान उघडे ठेवल्याप्रकरणी 20 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुख्यधिकाऱ्यांनी नियम मोडणाऱ्या किराणा दुकानदारास ठोठावला वीस हजारांचा दंड

नियमांचा भंग केल्याने दंड

किराणा व्यापाऱ्यांना वेळोवेळी पूर्वसूचना देऊनही दुपारच्या सुमारास दुकानात ग्राहकांना किराणा देताना वसंत नारायण कोडगीरवाड हा किराणा दुकानावर पथकाला आढळून आले. नियमाचा भंग करून उघडलेले असल्यास त्यांच्याकडून दंड आकारून ती अस्थापना कोरोनाची अधिसूचना अमलात असेपर्यंत बंद करण्यात बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. ही कारवाई मुख्यधिकारी आकाश सुरडकर, पोलीस कर्मचारी, नगरपंचायत लिपिक वसंता गायकवाड, राजू दवणे, विशाल खोपे उपस्थित होते.

हेही वाचा - किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

Last Updated : May 12, 2021, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.