ETV Bharat / state

कोलारपिंपरी कोळसा अफरातफर प्रकरणी सीबीआय अन् दक्षता पथक दाखल

author img

By

Published : Mar 13, 2021, 8:10 PM IST

Updated : Mar 13, 2021, 9:25 PM IST

एक हजार टन कोळशाच्या अफरातफरी प्रकरणी झालेल्या तक्रारीअंती केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) व दक्षता (व्हिजिलन्स) विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोलरपिंपरी कोळसा खाणीत धाडसत्र सुरू केले आहे.

SBI and vigilance team raid on kolarpimpri Coal mine at yavatmal district
कोळसा खान

यवतमाळ - वेकोलीच्या वणी उत्तर क्षेत्रातील कोलरपिंपरी कोळसा खाणीत सुरू असलेल्या रोडसेलमध्ये प्रचंड अनागोंदी कारभार सुरू आहे. एक हजार टन कोळशाच्या अफरातफरी प्रकरणी झालेल्या तक्रारीअंती केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) व दक्षता (व्हिजिलन्स) विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोलरपिंपरी कोळसा खाणीत धाडसत्र सुरू केले आहे. कोळशाच्या होत असलेल्या अनागोंदी प्रकाराबाबत चौकशी सुरू केली आहे. या धाडीबाबत वेकोली उत्तर क्षेत्राचे महा प्रबंधक ईश्वरदास जक्यानी यांना विचारणा केली असता त्यांनी कारवाईला दुजोरा दिला आहे.

कोलारपिंपरी

अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शक्यता

काही दिवसांपूर्वी 968 टन कोळशाची अफरातफर झाली होती. या प्रकरणी नियमाला बगल देत अल्प दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर रोडसेलसाठी कोळसा उचलताना चांगल्या प्रतीचा कोळसा ट्रकद्वारे वाहून नेण्यात येत आहे. डीओ धारकाची मनमानी व अधिकाऱ्यांचे संगनमत याला कारणीभूत असून उच्च प्रतीच्या कोळशाची होत असलेली नियमबाह्य उचल यामुळे वितरणाचे 'टार्गेट' पूर्ण होत नाही.

वितरणाच्या नियमाला बगल

कोलइंडिया व वेकोली ने उत्खनन झालेल्या कोळशाच्या वितरणाबाबत नियमावली तयार केली आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच कोळसा खाणीतील काट्यावरून ट्रक भरण्यात येतात. मात्र, कोलारपिंपरी कोळसा खाणीत नियमाची पायमल्ली करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत ट्रक भरण्यात येत असल्याची चर्चा आहे. ज्या डीओ धारकाचा कोळसा शिल्लक आहे. त्यांच्या हितार्थ मुख्य महाप्रबंधक व उपप्रबंधक झटत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - यवतमाळ जिल्ह्यातील सर्व व्यवसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक

हेही वाचा - पैनगंगा अभयारण्यातील बंदी भागात पट्टेदार दोन वाघाचे दर्शन

Last Updated : Mar 13, 2021, 9:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.