ETV Bharat / state

केंद्रीय पथकाची जिल्ह्यात अचानक धडक; लसीकरण केंद्र व कोव्हीड केअर सेंटरची पाहणी

author img

By

Published : Apr 8, 2021, 8:13 PM IST

जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने यवतमाळ धडक दिली. पथकातील राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे प्राध्यापक डॉ. जयंत दास आणि राम मनोहर लोहिया हॉस्पीटलचे सहायक प्राध्यापक डॉ. देवांग भारती यांनी शहरातील पाटीपुरा येथील लसीकरण केंद्र व वाघापूर रोडवरील कोव्हीड केअर सेंटरची पाहणी केली.

Central team inspects Vaccination Center and Covid Care Center in Yavatmal district
केंद्रीय पथकाची यवतमाळ जिल्ह्यात लसीकरण केंद्र व कोव्हीड केअर सेंटरची पाहणी

यवतमाळ - जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने यवतमाळ धडक दिली. पथकातील राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे प्राध्यापक डॉ. जयंत दास आणि राम मनोहर लोहिया हॉस्पीटलचे सहायक प्राध्यापक डॉ. देवांग भारती यांनी शहरातील पाटीपुरा येथील लसीकरण केंद्र व वाघापूर रोडवरील कोव्हीड केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी यांची चांगलीच भंबेरी उडाली.

केंद्रीय पथकाची जिल्ह्यात अचानक धडक; लसीकरण केंद्र व कोव्हीड केअर सेंटरची पाहणी
लसीकरनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक-
डॉ. दास व डॉ. भारती यांनी लसीकरण केंद्रातील नोंदणी कक्ष, लसीकरण प्रतिक्षा कक्ष, निरीक्षण कक्षाची पाहणी करून लसीकरणाचे प्रा‍त्यक्षिक करायला सांगितले. केंद्रीय पथकाच्या समक्ष उपस्थित नर्सने लाभार्थ्याचे लसीकरण केल्यानंतर संबंधित नागरिकाला शासनाच्या सुचना समजावून सांगितल्या. लसीकरणानंतर एखाद्याला रिएक्शन झाली तर काय उपाययोजना करता, लसीकरणाबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण दिले का, अशी विचारणा केली असता शहरी व ग्रामीण भागातील सर्व आरोग्य यंत्रणेला प्रशिक्षण दिल्यानंतरच जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
कोव्हीड केअर सेंटरची पाहणी-
केंद्रीय पथकाने वाघापूर रोडवरील कोव्हीड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. कशाप्रकारे टेस्टे केली जाते. सध्या किती रुग्ण या केंद्रात भरती आहेत, त्यांना लक्षणे आहेत का, याबाबत माहिती घेतली. यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुषमा खोडवे यांनी पथकाला माहिती दिली. या केंद्रावर 70 टक्के नागरिकांचे आरटीपीसीआर व उर्वरीत 30 टक्के लोकांचे ॲन्टीजन टेस्ट केली जाते. तसेच रॅपीड ॲन्टीजन निगेटिव्ह आली व लक्षणे असले तर संबंधितांची आरटीपीसीआर सुध्दा केली जाते. सध्यास्थितीत येथे 58 रुग्ण दाखल असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. तसेच रुग्णांची सकाळ, संध्याकाळ आणि रात्री नियमित तपासणी केली जाते. यात ताप, ऑक्सीजन स्थर तपासण्यात येत असल्याचेही डॉ. खोडवे यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.