ETV Bharat / state

शेतातील पन्नास क्विंटल हरभरा जळून खाक

author img

By

Published : Mar 10, 2021, 7:11 PM IST

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील लोणी येथील शेतकरी साहेबराव गावंडे यांच्या शेतात हरभरा सोंगणी करून मळणीसाठी गंजी लावली होती.

fire
आग

यवतमाळ - जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील लोणी येथील शेतकरी साहेबराव गावंडे यांच्या शेतात हरभरा सोंगणी करून मळणीसाठी गंजी लावली होती. मात्र, रात्री अज्ञात व्यक्तीने या गंजीला आग लावल्याने 50 क्विंटल हरभरा जळून खाक झाला आहे.

अडीच लाखांचे नुकसान

शेतकरी साहेबराव राघोजी गावंडे यांनी आपल्या 10 एकर शेतापैकी 7 एकरात हरभऱ्याची लागवड केली होती. हरभरा परिपक्व होऊन तो वाळल्यानंतर मळणीसाठी सोंगणी करून त्याची गंजी लावून ठेवली. मात्र, काही कारणास्तव मळणी मशीनधारक न आल्याने ते घरी पोहोचले. दरम्यान, त्यांना शेतात आग लागल्याचा फोन आला. आग नियंत्रणात मिळाल्याने गंजीतीले सर्व 50 क्विंटल चना जळून खाक झाला असून जवळपास अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा - चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून; शिवाजी नगरातील घटना

हेही वाचा - कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन : यवतमाळमध्ये वर्षभरात सव्वादोन कोटींची दंड वसुली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.