ETV Bharat / state

वाघाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू, गावकऱ्यांनी लावले वाघाला हुसकावून

author img

By

Published : Jul 10, 2021, 3:38 PM IST

Updated : Jul 10, 2021, 4:06 PM IST

पांढरकवडा तालुक्यातील जामणी वनपरिक्षेत्रातील पिवरडोल या गावातील एका तरुणावर वाघाने शुक्रवारी रात्री हल्ला केला होता. यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. गावकऱ्यांनी त्या वाघाला हुसकावून लावले आहे. वन अधिकाऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकरी करत आहेत.

वाघ
वाघ

यवतमाळ - पांढरकवडा तालुक्यातील जामणी वनपरिक्षेत्र असलेल्या पिवरडोल या गावातील अविनाश पवन लेनगुरे (वय 18 वर्षे) या तरुणावर हल्ला केला. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 9) रात्रीच्या सुमारास घडली.

माहिती देताना पोलीस पाटील

अविनाश हा शुक्रवारी रात्री गावजवळच शौचास गेला असता वाघाने हल्ला करून त्याला गावा शेजारीच असलेल्या एका शेतात फरफटत ओढत घेऊन नेऊन ठार मारले. खूप वेळ होऊनही अविनाश आला नसल्याने त्याच्या आईवडिलांनी फोन लावला. पण, तो फोन उचलत नसल्याने रात्रीपासून त्याचा शोध घेणे सुरू केले. शनिवारी (दि. 10 जुलै) पहाटे काही ग्रामस्थांच्या नजरेस पडल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी उपवनसंरक्षक किरण जगताप, सहायक वनसंरक्षक सुभाष दुमारे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मेहरे, पाटण पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वाघ हा मृतदेहापाशीच ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. पाटण वनविभागाचे कर्मचारी, बचाव पथक व गावकऱ्यांनी वाघाला जंगलाकडे हुसकावून लावले. वन विभागाने तत्काळ वाघाचा बंदोबस्त करावा, जंगलालगत असलेल्या शेताला कुंपण करुन द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

हेही वाचा- यवतमाळमध्ये लहान मुलांसह म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डाचे नियोजन

Last Updated : Jul 10, 2021, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.