ETV Bharat / state

यवतमाळ : इसापूर येथे विवाह समारंभात अन्नातून विषबाधा, 100 जणांवर उपचार

author img

By

Published : Jun 7, 2022, 10:52 AM IST

विवाह समारभांत लग्नाच्या अन्नातून शंभराहून अधिक लोकांना विषबाधा ( people poisoned isapur ) झाल्याची घटना पुसद तालुक्यातील इसापूर येथे घडली. यात काही लहान मुले गंभीर ( people poisoned wedding isapur ) असल्याची माहिती मिळाली.

people poisoned wedding isapur
विषबाधा इसापूर

यवतमाळ - विवाह समारभांत लग्नाच्या अन्नातून शंभराहून अधिक लोकांना विषबाधा ( people poisoned isapur ) झाल्याची घटना पुसद तालुक्यातील इसापूर येथे घडली. यात काही लहान मुले गंभीर ( people poisoned wedding isapur ) असल्याची माहिती मिळाली. दुपारी विवाह संपन्न होताच दोन वाजताच्या सुमारास लग्न समारंभासाठी आलेल्या मंडळींनी जेवण केले. आणि जेवणानंतर काही जणांना मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी शेंबाळपिंपरी येथील खासगी रुग्णालयाची वाट धरली. अनेकांना हा त्रास जाणवू लागल्याने शेंबाळपिंपरी येथील चंदेल रुग्णालयासह इतर रुग्णालयात शंभराहूनवर रूग्ण दाखल करण्यात आले.

माहिती देताना आमदार

हेही वाचा - यवतमाळमध्ये लहान मुलांसह म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डाचे नियोजन

यात महिलांचाही समावेश होता. तर त्यातील काही लहान मुले गंभीर असून त्यांच्यावर उपचार सूर आहेत. विषबाधेचे शंभरच्या घरात वाढते रुग्ण लक्षात घेता शेंबाळपिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका व पुसद येथील रुग्णवाहिका रुग्णांना पुसद येथे हलविण्यासाठी बोलविण्यात आली. या घटनेची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आली. त्यानी रुग्णांच्या उपचाराबाबत आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहे. काही रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. पुसद रुग्णालयात या भागाचे आमदार इंद्रनिल नाईक यांनी भेट दिली असून सर्व रुग्ण आता धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले.

हेही वाचा - यवतमाळ : मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी आरटीआय कार्यकर्त्याचे टॉवरवर चढून आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.