ETV Bharat / state

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती ३१ मे पर्यंत संकलित करा - जिल्हाधिकारी

author img

By

Published : May 29, 2021, 7:13 AM IST

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची काळजी घेण्यासोबतच त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे, तसेत योग्य प्रकारे संगोपन करण्याची कारवाईसाठी अशा बालकांची माहिती ३१ मे पर्यंत संकलित करण्याचे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

वाशिम : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या १८ वर्षाच्या आतील बालकांची माहिती ३१ मे पर्यंत संकलित करावी, असे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस म्हणाले आहेत. जेणेकरून अशा बालकांची काळजी घेण्यासोबतच त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे, तसेत योग्य प्रकारे संगोपन करण्याची कारवाई करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सांगितले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गठीत जिल्हा कृती दलाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज आढावा बैठकीत ते बोलत होते.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा शोध घ्यावा

१८ वर्षाच्या आतील बालकांच्या पालकांचा जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी, अन्य जिल्हयातील जिल्हा शल्य चिकित्सकांशी समन्वय साधून पार पाडावी, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले आहेत. जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग आणि शहरी भागातील नगरपालिकांनी, कोरोनामुळे पालक गमावुन अनाथ झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी योग्य प्रकारे सर्व्हेक्षण करुन त्या बालकांचा शोध घ्यावा. नगरपरिषदेकडे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नोंद असल्याने, त्या कुटूंबाचा शोध घेवून, १८ वर्षाच्या आतील बालके अनाथ झाली असल्यास माहिती संकलीत करुन माहिला व बाल कल्याण विभागाला द्यावी. तसेच महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील त्या कुटूंबांची भेट घेवून माहिती घ्यावी, असेही ते म्हणाले आहेत.

महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन द्यावा

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोनाच्या संसर्गामुळे ज्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याने बालकांचा व महिलेचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला असेल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देवून स्वयंरोजगार उपलब्ध करुन द्यावा. कोरोनामुळे आई-वडिलांचा किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असेल, अशा बालकांची नावे व यादी तातडीने तयार करावी. त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे सोईचे होईल. गावपातळीवर अनाथ बालकांचा शोध घेण्यासाठी अंगणवाडी सेविकेने योग्य प्रकारे काम करावे, असे ते म्हणाले.

बाल संगोपन योजना मंजूर

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राठोड म्हणाले, जिल्हयातील प्रत्येक कोविड सेंटरमध्ये १८ वर्षाखालील बालकांच्या संरक्षणासाठी व त्यांच्या हितासाठी चाईल्ड हेल्पलाईनचा १०९८ हा टोल फ्री क्रमांक आहे. सद्यास्थितीत जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरमधून कोविडमुळे ज्यांचे एक पालक मृत्यू पावले असे १६ बालके, तर ज्यांचे दोन्ही पालक मृत्यू पावले असे ५ बालके अशी एकूण २१ बालकांची माहिती प्राप्त झाली आहे. चाईल्ड हेल्पलाईन मार्फत गृहचौकशी करुन त्यांना बाल संगोपन योजना मंजूर करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सर्व बालके नातेवाईकांकडे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठककीला सर्व अधिकारी उपस्थित

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी दिपक मोरे, जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. जयश्री गुट्टे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, समितीचे सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा - 'कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.