ETV Bharat / state

वर्ध्याच्या पुलगावमध्ये शिवभोजन थाळीला सुरवात

author img

By

Published : Apr 9, 2020, 9:20 AM IST

शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे गरजू, गोरगरीब, शेतकरी, कामगार व मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

wardha shivbhojan sceme
वर्ध्याच्या पुलगावमध्ये शिवभोजन थाळीला सुरवात

वर्धा - कोरोनामुळे सर्वत्र बंद असल्याने कोणाला जेवणाची अडचण होऊ नये, यासाठी सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेले हे केंद्र आता जिल्ह्यातील इतर भागांतही सुरू करण्यात आले. या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी यांना शिवभोजनच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली आहे.

wardha shivbhojan sceme
वर्ध्याच्या पुलगावमध्ये शिवभोजन थाळीला सुरवात

याच धर्तीवर पुलगाव येथे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री तथा आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते उपक्रमाला सुरवात करण्यात आली. शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुका स्तरावर विस्तार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे गरजू, गोरगरीब, शेतकरी, कामगार व मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात 10 ठिकाणी शिवभोजन केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

wardha shivbhojan sceme
वर्ध्याच्या पुलगावमध्ये शिवभोजन थाळीला सुरवात

जिल्ह्यात एक हजार शिवभोजन थाळींचे वितरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यावेळी आमदार कांबळे, देवळी तहसीलदार राजेश सरोदे, पुलंगाव शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर, रमेश सावरकर यांची उपस्थिती होती.

wardha shivbhojan sceme
वर्ध्याच्या पुलगावमध्ये शिवभोजन थाळीला सुरवात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.