ETV Bharat / state

अवैध दारूसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त; समुद्रपूर पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Nov 15, 2019, 11:16 AM IST

नागपूरहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी  केली जाते. समुद्रपूर पोलिसांनी सापळा रचून नागपूर महामार्गावरील आरंभा टोल नाक्यावर एका गाडीमधून दारूच्या चार हजार बाटल्यांसह एकूण 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गजानन संगेपवाड (वय 21 रा.बुट्टीबोरी) याला अटक करण्यात आली आहे.

अवैध दारुसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा - महागड्या गाड्यांमधून मध्यरात्री अवैध दारू वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात नेल्या जात असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी नागपूर महामार्गावरील आरंभा टोलनाक्यावर एका गाडीमधून दारूच्या चार हजार बाटल्यांसह एकूण 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गजानन संगेपवाड (वय 21 रा.बुट्टीबोरी) याला अटक करण्यात आली आहे.

गाडीमधून दारूच्या चार हजार बाटल्यांसह एकूण 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूरहून चंद्रपुरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवरून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरंभा टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनाच्या मागील सीटवर देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या.

हेही वाचा - चंद्रपूर : लाखोंच्या दारू साठ्यावर चालवला रोड रोलर

वाहनासह दारू जप्त करून समुद्रपूर पोलिसांनी पंचनामा केला आहे. जप्त करण्यात आलेला सर्व साठा समुद्रपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे. ही कारवाई समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अरविंद येनूरक, रवी पुरोहित, आशिष गेडाम, वैभव चरडे, सागर वातमोडे यांनी केली.

Intro:mh_war_samudrapur_daru_japt_vis_7204321


समुद्रपूर पोलिसांनी सापळालावून 11 लाखाचा दारुसह मुद्देमाल जप्त

वर्धा - नागपूर निघणाऱ्या अनेक महागड्या गाड्याच्या मदतीने दारू ही वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात महामार्गावरून मध्यरात्री नेल्या जाते. याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळताच रात्री महामार्गावरील आरंभा टोलनाक्यावर दारू जप्त करण्यात आली. कारमध्ये भरून असलेली देशी दारूच्या चार हजार बॉटलसह एकूण 11 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात गजानन संगेपवाड वय 21 बुट्टीबोरी रहवासी असलेल्यास अटक करण्यात आली.


नागपूर वरून चंद्रपुरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवरून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी रात्रीच्या वेळी केल्या जाते. चंद्रपूर आणि वर्धा दोन्ही जिल्हे दारूबंदी असले तरी दारूची वाहतुक होते हे सर्वश्रुत आहे. यात इनोव्हा गाडीत MH 31, CA-3440ने चंद्रपूरच्या दिशेने जात असताना आरंभा टोलनाक्यावर वाहन थांबले. अगोदरच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहन चालक आणि मागील भागात सीटवर देशी दारूच्या पेट्या आढळून आल्याता. यामध्ये तब्बल 4 हजार लहान बॉटल होत्या.ज्याची किंमत 2 लाख 80 हजात इतकी आहे. तसेच इतर कंपनीच्या 3 खोके उरात 14हजार 400 रुपयाची दारू जप्त करण्यात आली. तर वाहनांची किंमत 8 लाख रुपये असून एकूण 10 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यावर मुद्देमाल जप्त करत पंचनामा करण्यात आला असून सर्व दारू समुद्रपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आली.
गजानन लक्ष्मण संगेपवाड वय 21 वर्ष रा सातगाव बुट्टीबोरी यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी अरविंद येनूरक, रवी पुरोहित, आशिष गेडाम, वैभव चरडे, सागर वातमोडे यांनी केली.Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.