ETV Bharat / state

झारखंडला जाणार्‍या मजुराला वर्ध्यात उपचारासाठी उतरवले, मात्र वाटेतच जीव सोडला

author img

By

Published : May 26, 2020, 8:11 AM IST

सुरतवरून सुटलेल्या ट्रेनमध्ये एका ४४ वर्षीय प्रवाशाची प्रकृती बिघडल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याला कोरोनाचे लक्षणेही दिसून आली. यामुळे रेल्वेला वर्ध्यात थांबा देऊन रुग्णाला खाली उतरवण्यात आले, खबरदारी घेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अगोदरच गंभीर असल्याने डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केला आहे. यासह त्याचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पुढील माहिती देऊ मृतकाचे सह प्रवाशी यांच्यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे.

जिल्हा रुग्णालय वर्धा
Civil hospital wardha

वर्धा - लॉकडाऊननंतर अनेक जण वेगवेगळ्या जागी अडकून पडले. इच्छा असतांनासुद्धा त्यांना गावी जाता आले नाही. यात आता अडकलेल्यांना घरी जाण्याची संधी लाभली. पण यात अनेकजण दुर्दैवी ठरत आहे. सुरत वरून झारखंडला जाणाऱ्या श्रमिक ट्रेनमधून एका 44 वर्षीय प्रवाशाची कोरोनाची लक्षणे असल्याने प्रकृती बिघडली. यामुळे त्याला वर्ध्यात उपचारार्थ दाखल करण्यासाठी नेले असता, रस्त्यातच तो दगावल्याची घटना घडली आहे.

झारखंडयेथील अनेक जण पोटाची भाकर मिळवण्यासाठी गुजरातमधील सुरतला गेले. पण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाले. यात सर्वात जास्त मजुरवर्ग भरडला आहे. यात असे अनेक मजुरवर्ग भारतभर वेग वेगवेगळ्या राज्यात अडकले. अखेर सरकारने तिसरा टप्याच्या शेवटच्या टप्प्यापासून श्रमिक ट्रेन सुरू करून मजुरांना घरी सोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली.

सुरतवरून सुटलेल्या ट्रेनमध्ये एका ४४ वर्षीय प्रवाशाची प्रकृती बिघडल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याला कोरोनाचे लक्षणेही दिसून आली. यामुळे रेल्वेला वर्ध्यात थांबा देऊन रुग्णाला खाली उतरवण्यात आले, खबरदारी घेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अगोदरच गंभीर असल्याने डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केला आहे. यासह त्याचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पुढील माहिती देऊ मृतकाचे सह प्रवाशी यांच्यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.