ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महिलांचा गावाला पहारा, वर्धातील दारूबंदी महिला मंडळाचा उपक्रम

author img

By

Published : Mar 25, 2019, 12:17 AM IST

वर्धा जिल्ह्यात रविवारी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यावेळी आनंदवाडी गावातील दारूबंदी महिला मंडळाने मतदारांना कोणी दारूचे आमिष देऊ नये, यासाठी दिवसभर गावात फिरून पहारा दिला.

पहारा देत असताना महिला

वर्धा - जिल्ह्यात रविवारी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यावेळी आनंदवाडीच्या दारूबंदी महिला मंडळाने मतदारांना कोणी दारूचे आमिष देऊ नये. तसेच निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी दिवसभर गावात फिरून पहारा दिला.

पहारा देणाऱ्या महिला

जिल्ह्यात दारूबंदी असली तरी लपून छपून दारूची विक्री केली जाते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गावातील महिला मंडळाच्या मदतीने पथक स्थापन करून गावातील दारू तस्करीवर उपाय शोधला. आज आष्टी तालुक्यातील आनंदवाडी गावातील मंडळाने निवडणुकीत गावात पहारा देत ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला मदत केली.

ग्रामपंचायत निवडणुकीला दारूचे ग्रहण

जिल्ह्यात आज २९४ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुक म्हटले, की मतदात्याना मटणाची पार्टी, घोटभर दारू पाजून निवडणुकीत मतदान करून घेतल्याच्या अनेक घटना घडतात. शासन दरबारी याची नोंद नसली तरी या बाबींना कोणी नाकारत नाही? त्यामुळे गावातील निवडणुकीवर याचा अनुचित परिणाम पडू नये, यासाठी हे पाऊल येथील महिला मंडळांनी उचलले. चक्क गावात फिरत, गावातील मुख्य रस्त्यावर पहारा देत गावातील महिलांनी निवडणुकी प्रक्रियेत सहभाग घेतला. तसेच यावेळी सर्व महिलांनी मतदान केल्याचे सुद्धा दारूबंदी महिला मंडळाच्या दिपाली खोडे यांनी सांगितले.

Intro:R_MH_24_MARCH_WARDHA_DARU_BAND_NIVADNUK_VIS_1
1 फाईल मध्ये व्हिजवल बाईट एकत्र FTP करून पाठवली आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकी रविवारी पार पडली. निवडणूक आमिषाविना निपक्ष पार पडावी यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात. वर्ध्यातील आनंदवाडीच्या दारूबंदी महिला मंडळाने दिवसभर पाहरा देत वेगळाच उपक्रम राबविला. गावात दारुमुळे मतदानावर परिणाम होऊ नये. तसेच निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून गावात फिरून पाहरा दिला.

जिल्हा दारूबंदी असला तरी दारू ही विकली जाते हे चित्र उघड आहे. पोलीस प्रशासनाने गावातील महिलां मंडळाच्या मदतीने पथक स्थापन करत गावातील रोगावर गावातच उपचार शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातुनच तयार झालेले हे महिला मंडळ आहे. आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथील मंडळाने ग्रामपंचायत निवडणुकीत नारी शक्ती दाखवत पाहरा देण्याच काम प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून केले.

ग्रामपंचायत निवडणूकीला दारूचे ग्रहनच

जिल्ह्यात 294 ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक म्हटले की मतदात्याना मटणाची पार्टी घोटभर दारू पाजून निवडणुकीत मतदान केल्याचा अनेक घटना घडतात. शासन दरबारी याची नोंद नसली तरी या बाबीना कोणी नाकारणार नाहीच?. त्यामुळे गावातील निवडणुकीवर याचा अनुचित परिणाम पडू नये, यासाठी हे पाऊल येथील महिला मंडळांनी उचलले. चक्क गावात फिरत, गावातील मुख्य रस्त्यावर पाहरा देत गावातील महिलांनी निवडणुकी प्रक्रियेत सहभाग घेतला. सोबत मतदान केल्याचे सुद्धा दारू बंदी महिला मंडळाच्या दीपाली खोडे यांनी सांगितले.

आष्टी तालुक्यातील दारू बंदी महिला मंडळाने उचललेले जे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. गावातील रोगांवर गावातच उपचार झाल्यास स्वस्थ अस प्रशासन मिळेल आणि लोकांचे जीवनमान उचवतील. त्यासाठी हे एक आशादायी पाऊल इतर ही ठिकाणी पडो अशी आशा करूया.....


Body:पराग ढोबळे,वर्धा


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.