ETV Bharat / state

वर्ध्यात ५ जणांची कोरोनावर मात, 3 वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश

author img

By

Published : May 30, 2020, 9:41 AM IST

नवी मुंबईतून आर्वी तालुक्यातील जामखुटा येथे आलेल्या तीन व्यक्तीना कोरोनाची लागण झाल्यामुळे सेवाग्राम येथील कोविड रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यासोबत तीन वर्षांच्या चिमुकल्यालाही कोरोनाची लागण झाली होती. या चिमुकल्याने कोरोनावर मात केली आहे. त्यांच्यावर 14 दिवस उपचार केल्यावर त्यांची दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. खबरदारी म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी चाचणीत ते कोरोनामुक्त झाले असल्याचे खात्री झाली. त्यामुळे शुक्रवारी त्यांना टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला. 

wardha corona update
वर्ध्यात पाच जणांची कोरोनावर मात

वर्धा - जिल्ह्यात शुक्रवारी ५ जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये तीन वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. कोरोनातून बरे झाल्याचा आनंद या सर्वांच्या चेहर्‍यावर दिसत होता. यावेळी रुग्णालयात उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवत या सगळ्यांना निरोप दिला.


नवी मुंबईतून आर्वी तालुक्यातील जामखुटा येथे आलेल्या तीन व्यक्तीना कोरोनाची लागण झाल्यामुळे सेवाग्राम येथील कोव्हिड रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यासोबत तीन वर्षांच्या चिमुकल्यालाही कोरोनाची लागण झाली होती. या चिमुकल्याने कोरोनावर मात केली आहे. त्यांच्यावर 14 दिवस उपचार केल्यावर त्यांची दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. खबरदारी म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी चाचणीत ते कोरोनामुक्त झाले असल्याचे खात्री झाली. त्यामुळे शुक्रवारी त्यांना टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला.

सावंगी मेघे येथील विनोबा भावे रुग्णालयात अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील मेंदूज्वराच्या आजारासाठी दाखल झालेल्या तरुणीसोबत तिच्या दोन बहिणी व आई सुद्धा कोरोनाबाधित झाले होते. त्यापैकी आई आणि एका बहिणीचा अहवाल 14 दिवसानंतर निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांनाही घरी सोडण्यात आले. यावेळी विलगिकरणात असलेल्या वडिलांनाही सोडण्यात आले. उर्वरित दोन बहिणींची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांना सोडण्यात येणार आहे.

यावेळी सावंगी मेघे येथे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रीती डुडुलकर, सावंगी मेघे रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अभ्युदय मेघे, रुग्णालयातील डॉक्टर यांनी बऱ्या झालेल्या रुग्णाला प्रमाणपत्र आणि शुभेच्छापत्र देऊन निरोगी राहण्याच्या शुभेच्छा दिल्यात.

तसेच या रुगणांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांमध्ये सावंगी येथील डॉ. संदीप श्रीवास्तव, ललित वाघमारे, चंद्रशेखर महाकाळकर, सुनिल कुमार, हेमंत देशपांडे, विठ्ठल शिंदे, माधुरी ढोरे इत्यादी डॉक्टरांचा समावेश आहे. यावेळी इतर अधिकारी, डॉक्टर, दवाखाना प्रशासनाचे अजय ठाकरे, सुशांत वानखडे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.