ETV Bharat / state

२० रुपये न दिल्याने चाकूने केले सपासप वार, तरुणाचा जागीच मृत्यू

author img

By

Published : May 24, 2021, 2:55 PM IST

Updated : May 24, 2021, 3:19 PM IST

मृत अनिल हा चहाच्या दुकानात काम करून कुटूंबासोबत तो जय जनता कॉलनी परिसरात राहत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास आरोपी साहिल मैराळे हा जय जनता कॉलनी मधील एका गल्लीत गांजा पिण्यासाठी बसला होता. त्यावेळी घरी रस्त्याने जाणाऱ्या मृत अनिलकडे आरोपीने २० रुपये मागितले.

Youth murdered
तरुणाची निर्घृण हत्या

ठाणे - २० रुपये देण्यास नकार दिल्याच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प ५ भागातील जय जनता कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. साहिल मैराळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अनिल आहुजा असे मृताचे नाव आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त (परिमंडळ-४) प्रशांत मोहिते

गांजा पिण्यासाठी आरोपीने मागितले होते २० रुपये -

मृत अनिल हा चहाच्या दुकानात काम करून कुटूंबासोबत तो जय जनता कॉलनी परिसरात राहत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास आरोपी साहिल मैराळे हा जय जनता कॉलनी मधील एका गल्लीत गांजा पिण्यासाठी बसला होता. त्यावेळी घरी रस्त्याने जाणाऱ्या मृत अनिलकडे आरोपीने २० रुपये मागितले. मात्र, ते देण्यास अनिलने नकार दिला. त्यामुळे साहिलने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढून अनिलवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिलला तत्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा - बार्ज पी-305 दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला 70 वर

आरोपीकडून गुन्ह्यात वापरेला चाकू हस्तगत -

घटनेची माहिती मिळताच, हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला आणि आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले होते. त्यांनतर डीबी पथकातील अजय गायकवाड, अजय अहिरे, शेखर पाटील, विक्रम जाधव आणि नवनाथ काळे यांनी अवघ्या २ तासात आरोपी साहिल याला कॅम्प ४च्या सर्टिफाईट ग्राउंड जवळून ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला चाकू आढळून आला. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली आहे. त्याच्याविरोधात कलम ३०२ ,५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे पोपट करडकर करत आहे.

हेही वाचा - 'बार्ज'वरील ८ कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले गुजरातच्या वलसाड किनाऱ्यावर

Last Updated : May 24, 2021, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.