ETV Bharat / state

Waghela Tea Depot Raid : ठाण्यातील चहाप्रेमींना मोठा धक्का; वाघेला टी डेपोवर पडली FDA ची धाड

author img

By

Published : Aug 16, 2023, 10:15 PM IST

राज्यातील एक लोकप्रिय चहा पावडर कंपनी असलेल्या ‘वाघेला चहा’च्या अडचणी वाढल्या आहेत. औषध प्रशासनाने मंगळवारी वाघेला चहा डेपोवर छापा टाकला आहे. जवळपास आठ लाखांचा माल सील करण्यात आला आहे.

Waghela Tea
वाघेला चहा

माहिती देताना सामाजिक कार्यकर्त्या शशी अगरवाल

ठाणे : सुप्रसिद्ध वाघेला टी डेपोवर अन्न आणि औषध प्रशासनातर्फे धाड टाकण्यात आली आहे. वाघेला यांच्या चहा पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याने, चहा पिणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊन कॅन्सरही होऊ शकतो. अशी तक्रार ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या शशी अगरवाल यांनी केली होती. त्याआधारे धाड टाकण्यात आली असून जवळपास आठ लाखांचा माल सील करण्यात आला आहे. तसेच चहाचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अशीच धाड 2018 साली देखील टाकण्यात येऊन तब्बल 1080 चहाचे पॅकेट एफडीए तर्फे सील करण्यात आले होते.


अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार : ठाण्यातील चहाप्रेमींमध्ये वाघेला चहाला मोठी मागणी असून गेली अनेक वर्षे चहाप्रेमी या चहाचा आस्वाद घेत आहेत. मुख्य बाजारपेठेत असलेल्या भव्य दुकानातून दररोज मोठ्या प्रमाणात चहाची विक्री होते. तसेच वाघेला नाव सर्वांच्या पसंतीचे ठरले आहे. वाघेला चहा कंपनी चहाची पाने आसाम आणि पश्चिम बंगाल येथून मागवते. त्यावर प्रक्रिया करून ते पॅकिंगमध्ये विकले जाते. परंतु ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या शशी अग्रवाल यांनी या चहा पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची तक्रार अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली होती.

चहा पावडरमध्ये जास्त भेसळ : एफडीए आणि fssai ने घालून दिलेल्या 100 ppm च्या मर्यादेपेक्षा कैक पटींने जास्त भेसळ होत असल्याचा निकाल, एका खाजगी प्रयोगशाळेने दिल्यानंतर शशी अगरवाल यांनी याबाबतची तक्रार एफडीएकडे केली होती. शशी अगरवाल या देखील वाघेला चहा मधूनच चहा पावडर विकत घेत होत्या. परंतु काही काळाने त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. दर दिवशी केवळ दोन कप वाघेला चहा पिल्याने पुढे कॅन्सरचा धोका होऊ शकतो असे धक्कादायक विधान डॉक्टरांनी केले.

नागरिकांच्या जीवाशी खेळ: शशी अगरवाल यांच्या तक्रारीवरून मंगळवारी एफडीएकडून दुकानावर धाड टाकण्यात आली. तब्बल आठ लाखांचा माल सिल करण्यात आला. चहाचे नमुने चाचणीसाठी पाठवले असता यातून काहीही निष्पन्न होणार नाही असे विधान शशी अगरवाल यांनी केले. कारण की, २०१८ साली झालेल्या धाडीवेळी पाठवलेला नमुन्यांचा रिपोर्ट आलाच नाही. त्यात शशि अगरवाल यांनी पुन्हा 5 जानेवारी 2023 रोजी चहाचे नमुने चाचणीसाठी पाठवले होते. परंतु त्याच्यात दोन दिवस आधीच म्हणजे 3 जानेवारी 2023 रोजी एफडीएने चाचणीसाठी नमुने पाठवल्याचा रिपोर्ट दिला. याचा अर्थ एफडीएला शशी अगरवाल यांची तक्रार येणार असल्याची कुणकुण आधीच लागल्याचा आरोप देखील त्यांनी केला. अशा प्रकारे चाचणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांचे रिपोर्ट आजतागायत मिळालेच नाही. तर वाघेला चहा यांचा एफडीए अधिकाऱ्यांच्या संगनमताने नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा जीवघेणा खेळ अविरतपणे सुरूच असल्याचा आरोप अगरवाल यांनी केला.


आठ लाखांचा मुद्देमाल केला जप्त : या संपूर्ण प्रकरणानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत, आठ लाखांची चहा पावडर जप्त केली आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या कारवाई देखील सुरू ठेवण्यात येतील अशी माहिती अन्न आणि औषध विभागाने दिली आहे.



हेही वाचा -

  1. Hafkin Institute : हाफकिनकडून कोरोना लस निर्मिती बंद करणार -संजय राठोड
  2. पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध
  3. नागपुरात लाखो रुपये किमतीचं भेसळयुक्त तेल जप्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.