ETV Bharat / state

नवी मुंबई : उच्चशिक्षित सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, दुर्गंधी सुटल्याने घटना उघडकीस

author img

By

Published : Aug 3, 2021, 3:57 PM IST

Updated : Aug 3, 2021, 5:38 PM IST

नवी मुबंईतील ऐरोलीमध्ये दोन सख्ख्या बहिणींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आत्महत्या त्यांनी आर्थिक अडचणीतून केली आहे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

d
d

नवी मुंबई - नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये दोन सख्ख्या बहिणींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळ

दुर्गंधी सुटल्याने घटना उघडकीस

नवी मुंबई येथील ऐरोली परिसरातील सेक्टर 10 मध्ये असलेल्या सागर दर्शन सोसायटीमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सागर दर्शन सोसायटीमधील इमारत क्र. बी-15, खोली क्र.2:3 मध्ये या बहिणी बऱ्याच वर्षापासून राहत होत्या. लक्ष्मी पंथारी ( वय 33 वर्षे) व स्नेहा पंथारी (वय 26 वर्षे) अशी या बहिणींची नावे आहे.

लहान मुलांची शिकवणी घेऊन करत होत्या उदरनिर्वाह

लक्ष्मी पंथारी (वय 33 वर्षे) व स्नेहा पंथारी (वय 26 वर्षे) या दोघी बहिणी उच्चशिक्षित असून लहान मुलांची शिकवणी घेऊन आपला उदरनिर्वाह करत होत्या. या दोघींच्या वडिलांचे निधन झाले असून दहा वर्षांपूर्वी त्यांच्या आईनेही आत्महत्या केली होती.

सोसायटीमधील लोकांशी त्यांचा जास्त संपर्क नव्हता

आईवडील नसल्याने लक्ष्मी व स्नेहा या बहिणी सोसायटीच्या लोकांमध्ये फार मिसळत नव्हत्या. त्यामुळे त्यांचा सोसायटीला इतर लोकांशी संपर्क कमी होता.

घरातून दुर्गंधी आल्याने मिळाली आत्महत्येची माहिती

शुक्रवारपासून लक्ष्मी व स्नेहा या दोन बहिणी राहत असलेला फ्लॅट बंद होता. सोमवारी (दि. 2 ऑगस्ट) त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला. अनेकवेळा दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने सोसायटीतील रहिवासीयांनी स्थानिक माजी नगरसेवक ममित चौगुले यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती कळविली. माहिती मिळताच चौगुलेंसह काही माजी नगरसेवकांनी घटनास्थळी भेट दिली व शहनिशा केली. तसेच तात्काळ रबाळे पोलिसांना याबाबत माहिती दिली. रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शिरीष पवार व इतर पोलीस कर्मचारी यांच्या साहायाने सोसायटीतील नागरिकांनी घराचे कुलूप तोडले. त्यावेळी घरातील हॉलमध्ये मोठी मुलगी लक्ष्मी पंथारी व किचनजवळ स्नेहा पंथारी या दोघी बहिणींनी अंदाजे 2 ते 3 दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवले

रबाळे पोलीस निरीक्षक गुन्हे शिरीष पवार, सहायक पोलीस निरीक्षक गोळे व माजी नगरसेवक सुरेश भिल्लारे यांनी या बहिणींचे मृतदेह खाली उतरवून रुग्णवाहिकेद्वारे वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच भाईंदर येथे असलेल्या मृतांच्या आजी-आजोबा यांना कळविण्यात आले. याबाबत अधिक तपास रबाळे पोलीस करत असल्याचे समजते.

आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

लक्ष्मी व स्नेहा पांथरी या दोघी बहिणी लहान मुलांची शिकवणी घेऊन उदरनिर्वाह करत होत्या. मात्र, कोरोना काळात शिवकणी बंद असल्याने त्यांच्यापुढे घर कसे चालवायचे हा प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - ठाण्यात दोन मोबाईल चोरट्यांना अटक..... सीसीटीव्ही फुटेज आले समोर

Last Updated : Aug 3, 2021, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.