ETV Bharat / state

Wife Illegal Affair : पत्नीच्या अनैतिक संबंधाला विरोध अन् पतीचा...

author img

By

Published : Jan 25, 2022, 5:07 PM IST

Updated : Jan 25, 2022, 5:39 PM IST

पत्नीचे आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यासोबत अनैतिक संबंध (Wife Illegal Affairs) असल्याचे समोर आले. त्यानंतर पतीने त्याला विरोध केला होता. याच वादातून तिघांनी मिळून पतीचा खून (Husband Murder) करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत बांधून जंगलात फेकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

accused arrest
निजामपूर पोलिसांकडून तीन आरोपींना अटक

ठाणे - पत्नीचे आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यासोबत अनैतिक संबंध (Wife Illegal Affairs) असल्याचे समोर आल्याने पतीने त्याला विरोध केला होता. याच वादातून तिघांनी मिळून पतीचा खून (Husband Murder) करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत बांधून जंगलात फेकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी (Nijampur Police Station) ४८ तासातच गुन्हा उघडकीस आणून तिघाही आरोपींना शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

माहिती देताना पोलीस अधिकारी

तस्लीम हलिम अन्सारी (रा. आमपाडा , भिवंडी ), बिलाल उर्फ चांदबाबु साईद अन्सारी (रा. आमपाडा भिवंडी) आणि मोहंमद सलमान अब्दुल मुकीद शेख (वय २७ रा. पिराणी पाडा, भिवंडी) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर अरमान शेर अली शाह असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.

मृताच्या खिशात औषधाच्या चिठ्ठीहून पटली ओळख -

भिवंडीतील कांबा गावाच्या हद्दीतील जंगलात एका पांढऱ्या गोणीत बांधलेला मृतदेह २० जानेवारीला सकाळी आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच निजामपूरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून गोणीतील मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. पोलीस ठाण्यात अनोखळी व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा अज्ञात मारेकऱ्यांविरोधात दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला असता, मृतदेह बांधलेली गोणी आणि मृतदेहाच्या खिशात एका डॉक्टरने लिहून दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीहून मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला. हा मृतदेह अरमान शेर अली शाहचा असल्याचे समोर आले. तो कुटुंबासह भिवंडीतील आमपाडा भागात राहून एका मोती कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होता. विशेष म्हणजे पोलिसांनी १०० अधिक मोती कारखान्यात चौकशी केली असता तो खान कंपाउंड भागात असलेल्या मोती कारखान्यात कामाला होता. त्याच कारखान्यात तिन्ही आरोपी कामगार म्हणून काम करत असल्याचे तपासात समोर आले.

संशयित मोबाईल नंबरमुळे फुटले आरोपींचे बिंग -

मृत अरमानच्या खिशामध्ये मोबाईल ईयर कॉर्ड मिळून आले. मात्र, मोबाईल नव्हता त्यामुळे मृताच्या पत्नीकडे चौकशी केली असता मोबाईल क्रमांक सांगितला. परंतु तो मोबाईल फोन घरीच ठेऊन गेला असल्याचे देखील सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी केली त्यातून मृत हा पत्नीला कधी एकटीला सोडत नसल्याचे समोर आले. मात्र, त्याचे कारण कोणी सांगत नव्हते. त्यानंतर मृताच्या मोबाईलचे डिटेल पोलिसांनी काढले असता त्यामध्ये काही नंबर संशयित मिळून आले. त्यांचे तांत्रिक विश्लेशण करून त्यामधील संशयित क्रमांकाबाबत अधिक चौकशी करत असताना तो नंबर आरोपी सलमानचा असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे आरोपी सलमान हा स्वतः समोर आला व त्याने खुनाचा गुन्हा माझ्या समोर घडला असल्याचे पोलिसांना सांगितले.

हेही वाचा - Son Killed Father in Kolhapur: अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मुलाकडून पित्याची निर्घृण हत्या

अनैतिक संबंधाला विरोध केल्याने घडला खूनाचा गुन्हा -

आरोपी सलमानकडे पोलिसांनी चौकशी केली असता, त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे त्याने कबूल केले. मात्र, आरोपी सलमान पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी समोर आल्याचेही तपासात समोर आले. त्यानंतर सलमानने दोन सहकाऱ्यांच्या मदतीने मोती कारखान्यात तिघांनी लाकडी दांडक्याने प्रहार करून खून करून मृतदेह कांबा गावाच्या हद्दीत फेकल्याचे कबूल केले. तसेच मृताच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाला पतीने विरोध केला. त्यामुळे तिघांनी मिळून त्याचा खून केल्याचे आरोपींनी कबूली दिली.

दोन आरोपी भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातून अटक -

आरोपी सलमानने खुनाचा गुन्हा कबूल केला. मात्र तोपर्यत त्याचे दोन साथीदार उत्तरप्रदेश येथे पळून जाणार आहेत. परंतु कधी व कसे हे माहिती नसल्याचे सलमानने पोलिसांना सांगितले. यावरून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशमधील लखनऊला रवाना केले. मात्र दोन्ही आरोपीला पोलीस पथक आपल्या मागावर असल्याची कुनकून लागताच त्यांनी आपल्या मुळगांवी जाऊन लगेच परतीचा प्रवास सुरू केला व ते भुसावळ मार्गे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, दुसरे पोलिसांचे पथक भुसावळ येथे रवाना केले. त्यावेळी तस्लीम हलिम अन्सारी व बिलाल उर्फ चांदबाबु साईद अन्सारी दोघांनाही पोलीस पथकाने भुसावळ रेल्वे स्थानकाच्या परिसरातून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली.

हेही वाचा - समलिंगी तरुणाशी अ‍ॅपवरुन संपर्क करुन केले घृणास्पद कृत्य; व्हिडिओ काढून दिली धमकी

Last Updated : Jan 25, 2022, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.