ETV Bharat / state

Holi Festival 2023 : पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याचे आवाहन; अशा पद्धतीने करा नैसर्गिक रंगांची निर्मिती

author img

By

Published : Mar 4, 2023, 10:57 PM IST

पाण्याच्या होणारा अपव्यय आणि रासायनिक रंग या सर्व गोष्टी टाळत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने ठाणेकरांना केले आहे. पर्यावरण दक्षता मंडळाने दरवर्षीप्रमाणे नुकतीच नैसर्गिक रंगांची कार्यशाळा आयोजित करून निसर्गातील रंगांचा प्रचार व प्रसार करून जनजागृती केली.

Holi Festival 2023
पर्यावरण दक्षता मंडळाने घेतलेली कार्यशाळा

पर्यावरण दक्षता मंडळाने घेतलेली कार्यशाळा

ठाणे : होळी म्हटली की धुळवड आलीच. मात्र, रासायनिक रंगांचा बेरंग टाळुन नैसर्गिक रंगानी होळी साजरी करण्याचे आवाहन केलं जात आहे. ठाणेकर नागरिकांनी होळीच्या सणाला वृक्षतोड, पाण्याच्या होणारा अपव्यय आणि रासायनिक रंग या सर्व गोष्टी टाळत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाने दरवर्षीप्रमाणे नुकतीच नैसर्गिक रंगांची कार्यशाळा आयोजित करून निसर्गातील रंगांचा प्रचार तसेच प्रसार करून जनजागृती केली आहे. यावेळी बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला.

नैसर्गिक रंग बनवण्याच्या प्रक्रिया: नैसर्गिक रंग बनवण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. यामध्ये रंगविण्याच्या आवश्यक प्रक्रियेसाठी डाई असलेली सामग्री पाण्यात भिजवून ठेवणे आवश्यक आहे. द्रावण विस्तारासाठी उकळले जावे आणि कपड्यांना द्रावणामध्ये रंगवायचे. रंग समान रीतीने कापडात स्थानांतरित होत नाही तोपर्यंत अधूनमधून ढवळत राहिले पाहिजे. बहुतेक वनस्पती रंगांना कपड्यांच्या तंतुंमध्ये रंग निराकरण करण्यासाठी रासायनिक वापर करायचा. वेगवेगळ्या मॉर्डंटचा वापर करून, एकाच रंगामधून विविध रंग आणि छटा देखील दाखवू शकतात. पारंपारिक रंगामध्ये सामान्य मॉर्डंट्स व्हिनेगर, बाभुळ ओक झाडाची साल, भक्कम लाकूड व कडू फळे असलेले झाड, किंवा क्षार राखून द्रावण तयार करता येतात.

नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहन: महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात 'होळी उत्सव' साजरा केला जातो. होळीनंतर धुळवडीत रंगाची निवड करताना सतर्क राहायला हवं. चुकीच्या रंगामुळे शरिराला अपाय होऊ शकतो. ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाने याविषयी कार्यशाळा घेऊन घरगुती नैसर्गिक रंगाचा वापर करून होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. धुळवडीत नैसर्गिक रंग वापरल्याने पर्यावरण रक्षणासोबतच शारीरीक इजा होणार नसल्याचे नमुद करून नैसर्गिक रंग कसे बनवायचे त्याची प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यशाळेला बी. एन. बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी भेट देऊन कुतुहलाने विविध नैसर्गिक रंग बनवण्याचा आनंद लुटलाय.

केमिकल युक्त रंग हानिकारक: होळी - धुळवडीसाठी बाजारात मिळणाऱ्या भेसळयुक्त रंगामुळे शरीरावर अपाय होतातच किंबहुना पर्यावरणाचीही हानी होते. शिवाय हवेचे तसेच मातीचेही प्रदुषण होते. परिणामी मानवी आरोग्याचे रक्षण होते. तेव्हा, घरच्या घरी नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्यशाळेतुन दिले जात असतं. फळे, फुले, भाजीपाला तसेच निसर्गातील अनेक गोष्टींपासून रंग सहज उपलब्ध करता येऊ शकतात. हे कार्यशाळेत प्रत्यक्ष दर्शवण्यात येते. याचा प्रचार तसेच प्रसार व्हावा यासाठी प्रत्येकाने याची जनजागृती किमान पाच जणांना करावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक होळी करा साजरी: होळी हा मोठा सण असला तरी मात्र काही लोक होळी खेळणे टाळताना दिसतात. वास्तविक, अशा लोकांना होळीवर काही आक्षेप नसतो. परंतु ते केमिकलयुक्त रंग आणि गुलालमुळे होळी खेळणे टाळतात. काही लोकांची त्वचा संवेदनशील असते व या रसायनामुळे त्यांना विविध समस्या निर्माण होतात. रंगाचा गुलाल डोळ्यात गेला तर त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही नैसर्गिकरित्या बनवलेला हर्बल गुलाल किंवा हर्बल कलर वापरू शकता आणि पर्यावरणपूरक होळी खेळू साजरी करू शकता.

हेही वाचा: Honey Village Story: मेळघाटातील मधाने आणला आदिवासी बांधवांच्या जीवनात गोडवा; नेमकं काय आहे 'चिखलदरा हनी'चे रहस्य...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.