ETV Bharat / state

Firing On Builder : अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

author img

By

Published : Apr 24, 2022, 10:04 PM IST

अंबरनाथ शहरातील एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली ( Shooter Firing On Bulider In Ambernath ) आहे. ही घटना कमलाकर नगर परिसरात असलेल्या एका इमारतीच्या सोसायटी ऑफिसमध्ये घडली आहे.

Firing
Firing

ठाणे - अंबरनाथ शहरातील एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कमलाकर नगर परिसरात असलेल्या एका इमारतीच्या सोसायटी ऑफिसमध्ये घडली ( Shooter Firing On Bulider In Ambernath ) आहे. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या अज्ञात शुटर विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शुटरचा तपास करत आहेत. कमरुद्दीन खान, असे गोळीबारात बचावलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.

खिडकीमधून केला गोळीबार - बांधकाम व्यावसायिक कमरुद्दीन खान हे जमियात या कॉ-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आहेत. आज ( 24 एप्रिल ) दुपारच्या सुमारास ते सोसायटीच्या ऑफिसमध्ये बसले होते. त्याच सुमाराला ऑफिसच्या खिडकीमधून अज्ञात शुटरने त्यांच्यावर पिस्तूल मधून दोन राउंड फायर केले. मात्र, या दोन्ही गोळ्या भिंतीमध्ये घुसल्याने कमरुद्दीन हे थोडक्यात बचावले. हल्लेखोर शुटर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण, हल्लेखोर कोण होते आणि त्याचा यामागचा उद्देश काय होता, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही

बांधकाम व्यावसायिक आणि पोलिसांची प्रतिक्रिया

जागेच्या वादातून गोळीबार - जागेच्या वादातून नियाज सिद्दीकी यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा संशय कमरुद्दीन खान यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट आणि कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा - Ajit Pawar : भान ठेवा, उचकवण्याचं काम करू नका : अजितदादांनी टोचले राणांचे कान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.