ETV Bharat / state

Thane Crime News : धक्कादायक! बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; शिक्षिकेवर गुन्हा दाखल

author img

By

Published : Mar 22, 2023, 7:11 PM IST

भिवंडीतील शासनाच्या बालसुधारगृहात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बालसुधारगृहातील काही अल्पवयीन मुलांचे सुधारगृहातील ४० वर्षीय शिक्षिकेकडून लैगिक शोषण केल्याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Thane Crime News
बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

ठाणे : भिवंडी शहरातील कचेरीपाडा भागात राज्य शासनाच्या वतीने बालसुधारगृह असून, हे बालसुधारगृह भिवंडीतील एका संस्थेमार्फत चालविण्यात येते, विशेष म्हणजे या बालसुधारगृहात असलेल्या मुलांच्या देखभालीसह शिक्षणासाठी अनुदानित संस्था कार्यरत आहे. याच संस्थेच्या वतीने येथील अल्पवयीन मुलांच्या शिक्षणासाठी काही शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. मात्र, या बालसुधारगृहात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या एका चाळीस वर्षीय शिक्षिकाही येथील काही मुलांचे लैगिक शोषण करीत असल्याच्या वारंवार तक्रारी पीडित मुलांकडून केल्या जात होत्या.


सदर शिक्षिकेला तीन महिन्यांपूर्वी केले होते निलंबित : त्यातच गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेशी काही कर्मचारी आणि संस्था पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर सदर शिक्षिकेला तीन महिन्यांपूर्वी निलंबित केले. शिवाय बाल न्यायालयीन आदेशानुसार संबंधित प्रकरणाची जिल्हा महिला बाल विकास विभागाकडून चौकशी सुरू असतानाच, बालसुधारगृहातील मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, पीडित मुलांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून आलेल्या माहितीच्या आधारे निरीक्षणगृह प्रशासनाकडून त्या शिक्षिकेवर शांतीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

Shockingly Case has been Registered Against a Teacher who Sexually Abused Minor Children in a Childrens Correctional Home
बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलांचे लैगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

विद्यार्थी-शिक्षक नात्याला काळिमा : भिवंडी शहरातील या घटनेने शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करून या शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे अशा प्रकारे लैंगिक शोषण होणार असेल तर आता त्यांच्यासाठी कोणती जागा योग्य होणार आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

लैंगिक शोषणात आणखी एका शिक्षिकेचा समावेश : तर दुसरीकडे पीडित मुलांवर होणाऱ्या लैंगिक शोषण प्रकरणात आणखी एका बालसुधारगृहातील शिक्षिकेचा समावेश असल्याचा संशय जिल्हा महिला बालविकास विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने भिवंडीतील शासकीय बालसुधारगृहात असलेल्या पीडित मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरण; नागपूर पोलिसांचे पथक बेळगावात, बंगळुरुमधील तरूणीबाबत महत्वाची माहिती समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.