ETV Bharat / state

Policeman Attempted Suicide : पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, उपचार सुरू

author img

By

Published : Jul 31, 2023, 11:01 PM IST

पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. विकास माने असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून तो ठाणे पोलीस दलात कार्यरत आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Policeman Attempted Suicide
कर्मचाऱ्यावर उपचार सुरू

ठाणे : कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज रोडवरील शंकेश्वर कृपा इमारतीमध्ये विकास माने आपल्या कुटुंबासह राहतात. ते ठाणे पोलीस दलात कार्यरत आहेत. आज (सोमवारी) सकाळच्या सुमारास विकास माने यांनी राहत्या घरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच विकासचे नातेवाईक व त्याच्या मित्राने त्याला रुग्णालयात दाखल केले. विकास व त्याच्या पत्नीचे वाद सुरू असून विकास यांना वारंवार धमकी व दबाव टाकला जात होते. यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले, असा आरोप विकास यांच्या नातेवाईकांनी केला आहे. आता याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


घटनेची चौकशी करावी: दुसरीकडे पोलीस कर्मचारी विकासवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी बॉइज संघटनेचे उमेश भारती यांनी केली आहे. गेल्याच महिन्यात कल्याण रेल्वे स्टेशन समोरील स्कायवॉकच्या खालच्या बाजूने एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. मात्र, या खळबळजक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. विठ्ठल मिसाळ असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव असून तो बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले होते.

खासगी रुग्णालयात उपचार सुरू - पोलीस कर्मचारी विकास वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात असून विकास आणि त्याच्या पत्नीचे वाद सुरू असल्याचे समजते.न विकासाला पत्नीकडून वारंवार धमकी व दबाव टाकला जात असल्याने त्याने आत्महत्याचे पाऊल उचलण्याचा आरोप पोलीस कर्मचारी विकासच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी बॉइज संघटनेचे उमेश भारती यांनी केली आहे.

गेल्याच महिन्यात आणखी एकाने केली होती आत्महत्या - गेल्याच महिन्यात कल्याण रेल्वे स्टेशन समोरील स्कायवॉकच्या खालच्या बाजूने एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र या खळबळजक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. विठ्ठल मिसाळ असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचं नाव असून तो बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.