ETV Bharat / state

Mira Bhayandar : रुग्णालयात चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यामुळे पालकांचा ठिय्या

author img

By

Published : May 27, 2022, 3:52 PM IST

Updated : May 27, 2022, 4:06 PM IST

डॉक्टरांच्या निष्काळजीपणा आणि चुकीच्या पद्धतीने उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयात प्रवेशद्वारवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून नातलग्नाचे समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

आंदोलन
आंदोलन

मीरा भाईंदर - मिरारोडच्या भक्ती वेदांत रुग्णालयात डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे चार वर्षाच्या हर्ष माच्छीचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणा आणि चुकीच्या पद्धतीने उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयात प्रवेशद्वारवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून नातलग्नाचे समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

पालकांचा ठिय्या


हर्ष माच्छी चार वर्षाच्या चिमुरड्याला पाच दिवसांपूर्वी उलटी होऊ लागल्याने भक्ती वेदांत रुग्णालयात घेऊन आले. त्यावेळी डॉक्टरानी दोन पायावर इंजेक्शन दिले आणि घरी जाण्यास सांगितले. मात्र रस्त्यात जाताना त्याला त्रास होऊ लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू केले आणि त्यावेळी कुटुंबातील सदस्य यांनी काय झाले अशी विचारपूस केली असता, त्याच्या डोक्यात रक्तस्त्राव होतोय असे सांगून वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट कराव्या लागतील, असे सांगितले. अचानक शुक्रवारी सकाळी ७ च्या दरम्यान साप चावल्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचा निषेध म्हणून नातलगानी ठिय्या मांडला आहे. संबंधित भक्ती वेदांत रुग्णालय व डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा - Mother Plea Rejected : सात वर्षांच्या मुलाचा ताबा वडिलांना न देणारी आईची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Last Updated : May 27, 2022, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.