ETV Bharat / state

Employees Retired : ठाणे महापालिकेतील एकशे अकरा कर्मचारी एकाच दिवशी होणार निवृत्त, पालिकेची दमछाक

author img

By

Published : May 28, 2023, 7:58 PM IST

ठाणे महापालिकेतील 100 कर्मचारी, 11 वरिष्ठ अधिकारी एकाच दिवशी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतराता भासणार आहे. एकीकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, तर दुसरीकडे भरतीपासून प्रक्रिया राबविली जात नसल्याने व्यवस्थापन कसे करायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.

Thane  Employees Retired
Thane Employees Retired

ठाणे : ठाणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या आधीच तुटपुंजी आहे. मे महिन्याच्या अखेरीस, म्हणजे एकाच दिवशी ठाणे महापालिकेतील सुमारे 100 कर्मचारी, 11 वरिष्ठ अधिकारी निवृत्त होणार आहेत. याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होणार आहे. लवकर भरती प्रक्रिया राबविण्याचा मानस पालिका प्रशासनाने व्यक्त केला असून, राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एकीकडे गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेतील अधिकारी, अभियंते, अनेक कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत असताना, मे महिन्यानंतर ठाणे महापालिका जम्बो रिटायरमेंटनंतर ठाणे महापालिका रिकामी होणार आहे.

कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया : सध्या ठाणे महापालिकेकडे वर्ग 1 - 176, वर्ग 2 - 155, वर्ग 3 - 2465, वर्ग 4 - 4010 असे मनुष्यबळ आहे. एकीकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, तर दुसरीकडे भरतीपासून प्रक्रिया राबविली जात नसल्याने व्यवस्थापन कसे करायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. ठाणे पालिकेतील गेल्या दोन वर्षांचा विचार केल्यास दर महिन्याला सरासरी ३० ते ९० कर्मचारी निवृत्त होत आहेत. या सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांमधील पोकळी भरून काढण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, यामुळे पालिकेतील महत्त्वाच्या पदावरील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा प्रश्न सुटत नाही.

मनुष्यबळ मिळविण्यासाठी कसरत : अधिकाऱ्यांची पदेही रिक्त असल्याने पालिकेतील एका अधिकाऱ्याकडे किमान पाच ते सात विभागांची अतिरिक्त जबाबदारी दिली जाते. मात्र, कामाचे प्रमाण पाहता अधिकाऱ्यांवरही या अतिरिक्त जबाबदारीचा भार पडत असल्याची टिप्पणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केली. अधिकारी भरती प्रक्रियेची रूपरेषा मंजूर झाली असली तरी, तीही अर्धवट स्वरूपात आहे. त्यामुळे पालिकेला आवश्यक मनुष्यबळ मिळविण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे अधिकाऱ्यांना वाटते.

ऐन पावसाळ्यात आपत्ती विभागाला नाव अधिकारी ? : ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमूख अधिकारी म्हणून अविनाश सावंत पदभार सांभाळत आहेत. सावंत हे मे महिन्यात सेवानिवृत्त होत असून त्याच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. दरम्यान ऐन पावसाच्या तोंडावर नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याने मोठी जबाबदरी येणाऱ्या अधिकाऱ्यावर असणारं आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.