ETV Bharat / state

नवीन वर्षात असणार 366 दिवस, विवाह इच्छुकांसाठी चंगळ; जाणून घ्या A to Z

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2023, 6:07 PM IST

Happy New Year 2024 : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी राज्यातील नागरिक सज्ज आहेत. तर येणार नवीन वर्ष कसे असेल जाणून घ्या.

New Year 2024
नूतन वर्ष २०२४

माहिती देताना दा. कृ. सोमण

ठाणे Happy New Year २०२४ : सोमवारी १ जानेवारी रोजी नूतन वर्ष २०२४ चा प्रारंभ होत आहे. यावर्षी सन २०२३ मध्ये लीप सेकंद धरला जाणार नसल्यानं नूतन वर्षाचा प्रारंभ रविवार ३१ डिसेंबर रोजी रात्री ठिक १२ वाजता होणार असल्याचं पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. सन २०२४ या नूतन वर्षाविषयी अधिक माहिती सांगताना दा. कृ. सोमण म्हणाले की, सन २०२४ हे लीप वर्ष असल्यानं या वर्षात जास्त काम करण्यासाठी आपणासर्वांस एक दिवस जास्त मिळणार आहे. सन २०२४ मध्ये ३६५ ऐवजी ३६६ दिवस असणार आहेत.

भारतातून ग्रहण दिसणार नाहीत : सन २०२४ मध्ये २५ मार्च रोजी छायाकल्प चंद्रग्रहण, ८ एप्रिल रोजी खग्रास सूर्यग्रहण, १८ सप्टेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण, २ ॲाक्टोबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. परंतू यापैकी एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही. सन २०२४ मध्ये १८ सप्टेंबर आणि १७ ॲाक्टोबर या दोन पौर्णिमांना सुपरमून (चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित) दिसणार आहेत. सन २०२४ मध्ये २४ सार्वजनिक सुट्ट्यांपैकी २ सुट्ट्या रविवारी येणार आहेत. २२ सुट्ट्या इतरवारी येणार असल्यानं चाकरमान्यांची सुट्ट्यांसंबंधी चंगळ होणार आहे.

यंदा ५ गुरुपुष्य योग : सन २०२४ मध्ये सोने खरेदी करणारांसाठी २५ जानेवारी, २२ फेब्रुवारी, २६ सप्टेंबर, २४ ॲाक्टोबर आणि २१ नोव्हेंबर असे ५ गुरुपुष्य योग येणार आहेत. गणेश भक्तांसाठी २५ जून रोजी एकच अंगारकी संकष्ट चतुर्थीचा योग येणार आहे. विवाह इच्छुकांसाठी सन २०२४ मध्ये जानेवारीमध्ये १२, फेब्रुवारीमध्ये १३, मार्चमध्ये ८, एप्रिलमध्ये १०, मेमध्ये २ , जूनमध्ये २, जुलैमध्ये ६, नोव्हेंबरमध्ये ६ आणि डिसेंबरमध्ये १३ विवाह मुहूर्त दिले आहेत, असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल, साई मंदिर आज राहणार रात्रभर खुलं
  2. वाढत्या कोरोनात नवीन वर्षाची पार्टी करताय? डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला
  3. आजची तारीख बघितली का? पुन्हा 100 वर्ष दिसणार नाही ही तारीख; का आहे खास?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.