ETV Bharat / state

Gram Panchayat Election भाजपमधील बंडखोरीचा महाविकास आघाडीला होणार फायदा, प्रमोद हिंदुरावांचा दावा

author img

By

Published : Dec 15, 2022, 1:01 PM IST

Updated : Dec 15, 2022, 2:55 PM IST

भाजपचे ठाण्यातील आमदार किसन काथोरे ( BJP MLA Kisan Kathore ) आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील ( Union Minister Kapil Patil ) यांच्यातील वाद मागील काही दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा आणि बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीला ( Maha Vikas Aghadi ) होणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव ( NCP Leader Pramod Hindurao claims ) यांनी केला आहे. त्यामुळे आगामी ग्राम पंचायत निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

NCP Leader Pramod Hindurao
ष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव

ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या ठाणे जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायती पैकी ६ बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ३६ ग्रामपंचायत निवडणुकीतील ( Gram Panchayat Election 2022 ) प्रचाराची रणधुमाळी संपण्यासाठी केवळ ४८ तास उरले. मात्र त्यापुर्वीच भाजपातील बंडखोरीसह गटबाजीचा फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव ( NCP Leader Pramod Hindurao claims ) यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना केला आहे.

ष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव

शिंदे गटाने सर्वाधिक ४२ ग्रामपंचायतीवर फडकवला झेंडा विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात ठाणे जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालात शिंदे गटाने सर्वाधिक ४२ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला ( Shinde Fiction Win In Gram Panchayat Election 2022 ) , तर ठाकरे गटाला ४० ग्रामपंचायतवर कब्जा मिळविण्यात यश आले होते. तर भाजप २५ ग्रामपंचायती जिंकून तिसऱ्या क्रमांकावर होता. आता पुन्हा ग्रामीण भागात निवडणुकीचा धुराळा अंतिम टप्प्यात आला असतानाच महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी अधिकाअधिक ग्रामपंचायतीवर एकजुटीने झेंडा फडकविण्याचा निर्धार केल्याचेही हिंदुराव यांनी सांगितले.

भाजपला ग्रासले गटबाजीसह बंडखोरीने ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ( Gram Panchayat Election 2022 ) भिवंडी तालुक्यात १४, मुरबाड तालुक्यात १४ तर कल्याण तालुक्यातील ९ तसेच शहापूर तालुक्यातील ५ अश्या ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी सर्वाधिक भिवंडी आणि मुरबाड तालुक्यात १४-१४ ग्रामपंचायत निवडणुका असून भिवंडी ग्रामीणमधून शिंदे गटाचे आमदार तर मुरबाड तालुक्यात भाजपचे आमदार आहेत. मात्र या दोन्ही तालुक्यात भाजपला गटबाजीसह बंडखोरीने ग्रासले आहे.

आमदार शांताराम मोरेंनी राखला गड भिवंडी तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक ४२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शिंदे गटाचे भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे ( MLA Shantaram More ) यांनी आपल्या मूळगाव असलेल्या खानीवली ग्रामपंचायतीतील सरपंचपदासह सातही सदस्य बिनविरोध निवडल्याने गावावर आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. मात्र भिवंडीतील कोनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने तालुक्यातील इतर ठिकाणीही त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. कोनमधून डॉ. रुपाली कराळे ह्या सरपंच पदासाठी पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. मात्र भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील ( Union Minister Kapil Patil ) यांनी डॉ. रुपाली कराळे यांना डावलून रेखा पाटील या नवख्या उमेदवाराला मैदानात आणल्याने त्याचा फायदा ठाकरे गटाला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

किसन कथोरे, कपिल पाटील यांच्यात राजकीय वाद मुरबाड तालुक्यात भाजपचे आमदार किसन कथोरे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात असून १४ ग्रामपंचयती निवडणुकीतील ३ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध आले आहेत. त्यामुळे मुरबाडमधील ११ ग्रामपंचयात निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे – ठाकरे गटासह राष्ट्रवादीमध्ये लढत होणार आहे. विशेष म्हणजे भाजपचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार किसन कथोरे आणि भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यात राजकीय वाद होऊन गटबाजी झाल्याचे पाहावयास मिळाली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी दोघांची समजूत काढून गटबाजी संपविण्याचा प्रयत्न काही महिन्यापूर्वीच केला होता. मात्र त्यांच्या मध्यस्थीच्या प्रयत्नाला यश आलेले दिसत नाही. दोघेही एकमेकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे टाळत असल्याचे गेल्या चार ते पाच महिन्यापासून पुन्हा दिसून आले.

महाविकास आघाडीची शिंदे व भाजपला रोखण्यासाठी रणनीती कल्याण तालुक्यात ९ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी १ बिनविरोध झाल्याने उर्वरित ८ जागेसाठी २६ सरपंच पदाचे उमेदवार मैदानात आहे. या तालुक्यात ठाकरे गटाचे वर्चस्व असून त्यांना टक्कर देण्यासाठी शिंदे व भाजप सज्ज असल्याने याठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ( Maha Vikas Aghadi ) शिंदे व भाजपला रोखण्यासाठी रणनीती आखल्याचे दिसून आले. तर शहापूरमध्ये ५ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी १ ठिकाणी बिनवरोध झाली आहे. तर उर्वरित ४ ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. या तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा असूनही शिंदे गटाने प्रचारात बाजी मारून भाजपासह राष्ट्रवादीला रोखण्यासाठी निवडणूक प्रचारात शिंदे गटाचे उपनेते प्रकाश पाटीलसह माजी आमदार बोरोरा यांनी शहापूर तालुक्यात ठाण मांडून निवडणुकीत रंगत आणली आहे.

मतदारराजा कोणाच्या पारड्यात मताचे दान जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी ६ ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने ३६ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या जागेसाठी ११४ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. तर जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतमधील ३६० सदस्य पदासाठी ६१३ उमेदवार विविध गावपातळीवरील पॅनलची उमेदवारी मिळवून मैदानात उतरले आहे. १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाचपर्यंत मतदान होणार आहे. तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे मतदारराजा कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकेल हे २० डिसेंबर रोजी समोर येणार आहे.

Last Updated : Dec 15, 2022, 2:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.