ETV Bharat / state

Raj Thackeray : टोल मुद्द्यावरुन मनसे आक्रमक; पाहा, राज ठाकरे काय म्हणाले...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 4:44 PM IST

Raj Thackeray On Toll Issues : टोल दरवाढी विरोधात मनसे नेते राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायास मिळालं. अशातच ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी टोल दरवाढीविरोधात उपोषण सुरू केलं आहे. यादरम्यान, आज राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची भेट घेतली व उपोषण मागे घेण्यास सांगितलं.

Raj Thackeray On Toll
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

प्रतिक्रिया देताना राज ठाकरे

ठाणे : Raj Thackeray On Toll Issues : महाराष्ट्रातील 65 ते 67 टोल नाके मनसेनेच बंद केले असा दावा करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला चांगलेच सुनावलं आहे. शिवसेना-भाजपच्या जाहीरनाम्यात टोल माफी (Toll Issues) दिवस आश्वासन असताना ते पूर्ण का झाला नाही. तसेच टोल वसुली करणारे कंपनीचे म्हैसकर हे कोणाचे लाडके आहेत? असे अनेक अडचणीत आणणारे प्रश्न राज ठाकरे यांनी विचारलं. गेले चार दिवस उपोषणाला बसलेले अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना देखील उपोषण मागे घेण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिलं.

अविनाश जाधव यांची घेतली भेट : नागरिकांकडून जबर टोल वसुली करणाऱ्या टोल नाके बंद करावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आंदोलन करत आली आहे. यावेळी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कार्यकर्ते यांनी अनेक मार्गांनी आंदोलन करून टोलनाक्यांविरोधात आपली भूमिका सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा गांधीगिरीने काम चालले नाही तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे थेट आमरण उपोषणाला बसले. चार दिवस त्यांनी उपोषण सुरू ठेवले असल्याने सरकार शरण येईल व यातून जनतेच्या हिताचा मार्ग काढला जाईल असा कयास बांधला जात होता. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेली बैठक देखील निष्फळ झाली. त्यानंतर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः येऊन अविनाश जाधव यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. चर्चानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सरकारला चांगलेच खडसावलं आहे.

सरकारला लगावला टोला : 2014 आणि 2019 च्या शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्ये टोल मुक्त महाराष्ट्र करू असे आश्वासन दिले असताना देखील टोलनाके सुरूच राहिले. तत्कालीन आमदार आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शपथविधीसाठी जाताना टोलनाक्यावर एक दगड भिरकावत हे टोलनाके बंद होतीलच असा शब्द नागरिकांना दिला होता. परंतु त्यांनी टोल नाकाच्या विरोधात दिलेल्या एफिडेविट देखील मागे घेतल्यानं त्यांच्या भूमिकेवर राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला. कोणाच्या सांगण्यावरून मागे घेतले असा परखड सवाल देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय. चार दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन टोल संदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगत त्यांनी अविनाश जाधव यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. टोल वसुली करणारी म्हैसकर आणि कंपनी मधील हे म्हैसकर कोण आणि कोणाचे लाडके आहेत? असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला. जनतेने सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि टोल भरायचा असेल तर भरा असा संदेश जनतेला दिला.

हेही वाचा -

  1. Raj Thackeray News: रस्ते करताना सरकारला भीती वाटेल असे आंदोलन करा - राज ठाकरे
  2. Banner In Nagpur : राज-उध्दव एकत्र यावे यासाठी कार्यकर्त्यांनी नागपुरात लावले बॅनर; महाराष्ट्राला तुमची गरज...
  3. Raj Thackeray criticizes Gadkari: केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी अपयशी हे महाराष्ट्राचे दुर्दैव-राज ठाकरे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.