ETV Bharat / state

मनसेच्या विधानसभा उमेदवाराकडून राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षावर जीवघेणा हल्ला

author img

By

Published : Jan 21, 2020, 10:11 PM IST

Updated : Jan 23, 2020, 5:43 PM IST

मनसेच्या विधानसभा उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंबरनाथ युवक अध्यक्षावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. कल्पना हॉटेलच्या बाहेर शनिवारी सायंकाळच्या सुमारास सचिन अहिरेकरवर अचानक मनसेचे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले सुमेध भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांनी हल्ला केला.

सचिन अहिरेकर आणि सुमेध भवार
सचिन अहिरेकर आणि सुमेध भवार

ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या(मनसे) विधानसभा उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंबरनाथ युवक अध्यक्षावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. सचिन अहिरेकर असे हल्ल्यात जखमी झालेल्या राष्ट्रवादी युवक अध्यक्षाचे नाव आहे. तर सुमेध भवार असे मनसेच्या हल्लेखोर उमेदवाराचे नाव आहे. या प्रकरणी सुमेध भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षावर जीवघेणा हल्ला


अंबरनाथ येथील कल्पना हॉटेलच्या बाहेर शनिवारी सायंकाळच्या सुमारास सचिन अहिरेकरवर अचानक मनसेचे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले सुमेध भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांनी हल्ला केला. अहिरेकर यांना दगडाने मारहाण झाल्याची माहिती समोर आली. या हल्ल्यात अहिरेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - 'शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या?'

सचिन अहिरेकरने आपल्याला फोन करून शिवीगाळ केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यानंतर तो दारू पिऊन भेटण्यासाठी आला होता. त्याने दारूच्या नशेत माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला त्यामुळे माझ्या अंगरक्षकांनी बचावाचा प्रयत्न केला असे मनसेच्या सुमेध भवार याने सांगितले.

या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे गृहमंत्री असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर असा हल्ला झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अंबरनाथ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या प्रकरणी गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

Intro:kit 319Body:मनसेच्या पराभूत उमेदवाराकडून राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षावर जीवघेणा हल्ला

ठाणे : विधानसभेच्या निवडणुकीत मनसेच्या पराभूत उमेदवाराने राष्ट्रवादीच्या अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्षावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
सचिन अहिरेकर असे हल्ल्यात जखमी झालेल्या राष्ट्रवादी युवक अध्यक्षाचे नाव आहे. तर सुमेध भवार असे हल्लेखोर मनसेच्या पराभूत उमेदवाराचे नाव असून त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या विरोधातही अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथच्या कल्पना हॉटेलच्या बाहेर शनिवारी सायंकाळच्या सुमारास अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्ष सचिन अहिरेकर यांच्यावर अचानक मनसेचे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले सुमेध भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांनी हल्ला केला. यावेळी अहिरेकर यांच्या डोक्यात दगड टाकल्याची माहिती आहे. या हल्ल्यात अहिरेकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सचिनने आपल्याला फोन करून शिवीगाळ केली त्याच बरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरले. शिवाय तो दारू पिऊन आला होता तो स्वतःच पडला असे मनसेच्या पराभूत उमेदवार सुमेध भवार यांनी सांगितले.
या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे गृहमंत्री असतांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर असा हल्ला झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आता अंबरनाथ राष्ट्रवादीचे पदाधिकारी या प्रकरणी गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

बाईट -सचिन अहिरेकर ( अंबरनाथ विधानसभा युवक अध्यक्ष )

बाईट -सुमेध भवार (मनसे पदाधिकारी )

बाईट -संजय धुमाळ (वरिष्ठ पोलीस निरीक्षक )


Conclusion:ambrnatha
Last Updated : Jan 23, 2020, 5:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.