ETV Bharat / state

Padgha Toll Plaza: नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; आमदार शांताराम मोरेंनी टोल वसुली पाडली बंद

author img

By

Published : Sep 15, 2022, 4:07 PM IST

नाशिक महामार्गावर खड्यांच्या साम्राज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी ( Traffic jam on Nashik highway ) झाली आहे. दुसरीकडे खड्डे दुरुस्तीचे काम सोडून पडघा टोल नाक्यावर ( Padgha toll plaza ) वसुलीसाठी वाहनचालकांची अडवणूक केली जात असल्याने चार ते पाच किलोमीटर पर्यत दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहे. हीच वाहतूक कोंडी पाहून स्थानिक शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे ( Shinde group MLA Shantaram More ) यांनी पडघा टोल नाक्यावरील वसुली बंद पाडून वाहतूक कोंडीतुन वाहनचालकांची सुटका केली.

Traffic jam at Padgha toll booth
पडघा टोल नाक्यावर वाहतूक कोंडी

ठाणे- नाशिक महामार्गावर खड्यांच्या साम्राज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी ( Traffic jam on Nashik highway ) झाली आहे. दुसरीकडे खड्डे दुरुस्तीचे काम सोडून पडघा टोल नाक्यावर वसुलीसाठी वाहनचालकांची अडवणूक केली जात असल्याने चार ते पाच किलोमीटर पर्यत दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहे. हीच वाहतूक कोंडी पाहून स्थानिक शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे यांनी पडघा टोल ( Padgha toll plaza ) नाक्यावरील वसुली बंद पाडून वाहतूक कोंडीतुन वाहनचालकांची सुटका केली. तर टोल कायमचाच बंद करावा अशी मागणी थेट मुख्यमंत्री आणि संबधित विभागाकडे केली आहे.



मुख्यमंत्र्याच्या आदेश झुगारून खड्डे जैसे थे ठेवून टोल वसुली - नाशिक महामार्गावरील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून जाताना प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांचा बराच वेळ वाहतूक कोंडीत जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. शिवाय या रस्त्यावर अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे एक महिन्यापूर्वी आमदार शांताराम मोरे यांनी टोल वसुली करणाऱ्या कंपनीला ( Toll Recovery Company ) लेखी पत्र देऊ आदी खड्डे दुरुस्ती करा मग टोल वसूल करा सांगितले होते. खड्डे दुरुस्तीसाठी खुद्द मुख्यमंत्री शींदेंनीही टोल कंपनीच्या मालकाशी संर्पक करून तातडीने महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. असे शिंदे गटाचे आमदार मोरे यांनी ई टीव्ही भारत शी बोलताना सांगितले. मात्र माझ्या लेखी पत्रासह मुख्यमंत्र्याच्या आदेश झुगारून खड्डे जैसे थे ठेवून टोल वसुली केली जात असल्याने टोल नाक्यावरील वसुली बंद पडल्याचे आमदार मोरे यांनी सांगितले.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; आमदार मोरेंनी टोल वसुली पाडली बंद..



पडघा टोल नाका कायमचा बंद करण्यासाठी पाठपुरावा - दरम्यान, महामार्गवरील खडयांमुळे आज सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी होऊन ६ ते ७ किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहे. त्यामुळे मार्गावरील खड्डे दुरुस्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी मागणी करत आमदार मोरे यांनी पडघा टोल नाका कायमचा बंद करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए तसेच रस्त्या संदर्भात असलेल्या विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे लेखी पत्र आमदार मोरे यांनी दिले होते. मात्र त्यावर सर्वच शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष केल्याने आज वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याचे पाहून स्वतः आमदारांनी रस्त्यावर उतरून टोल नाका परिसरातील वाहनांना वाट मोकळी करू दिली.



ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.