ETV Bharat / state

स्वच्छ सर्वेक्षणात 'मीरा-भाईंदर' राज्यात चौथ्या क्रमांकावर, देशपातळीवरही आघाडी

author img

By

Published : Aug 21, 2020, 7:41 AM IST

भारत सरकारच्या नगर विकास विभागामार्फत संपूर्ण देशात ४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण २०२० मोहीम राबवण्यात आली. या सर्वेक्षणात देशातील एकूण ४२४२ शहरांनी भाग घेतला होता.

मीरा-भाईंदर
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर (ठाणे) - राष्ट्रीय पातळीवर करण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२० उपक्रमात मिरा-भाईंदर शहराला गौरवण्यात आले आहे. यंदा राज्य पातळीवर चौथा तसेच राष्ट्रीय पातळीवर १९ वा क्रमांक प्राप्त झाल्यामुळे आरोग्य विभागाचे कौतुक करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर

भारत सरकारच्या नगर विकास विभागामार्फत संपूर्ण देशात ४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण २०२० मोहीम राबवण्यात आली. या सर्वेक्षणात देशातील एकूण ४२४२ शहरांनी भाग घेतला होता. त्यात लाख ते दहा लाख श्रेणीमधील लोकसंख्या असलेल्या शहरांमधून मिरा भाईंदर शहराचा देशात १९ वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक आला आहे. त्याचप्रकारे शहराला कचरामुक्त शहर म्हणून तीन तारांकित तसेच हागणदारी मुक्त कार्यामुळे 'ओडीएफ ++' म्हणून गौरवण्यात आले.

हेही वाचा - स्वच्छ भारत सर्वेक्षणात नागपूरची झेप, देशात पटकावले १८ वे स्थान

मिरा भाईंदर शहरातील वाढती लोकसंख्या तसेच शहरीकरणामुळे शहर स्वच्छ राखण्यास आरोग्य विभागावर मोठी जबाबदारी असते. अशा परिस्थितीत गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्याचा क्रमांक एका पदाने वधारला आहे तर देशात २७ व्या पदावरून यंदा १९ व्या क्रमांकावर प्रगती झाली आहे. त्याच प्रकारे सफाई कर्मचाऱ्यांच्या पुढाकारामुळे महानगरपालिकेला ६ हजार गुणांपैकी ४६०८ गुण प्राप्त करण्यास यश प्राप्त झाले.

मीरा भाईंदर महानगरपालिका एकूण चार वर्षाची आकडेवारी...!

सन देश पातळीराज्य पातळी
२०१७१३० ०९
२०१८४७ ०७
२०१९ २७ ०३
२०२०१९ ०४
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.