ETV Bharat / state

Thane Crime: सैन्यदलातील अधिकारी असल्याचं भासवून 7 महिलांशी लग्न, 'असा' प्रकार आला उघडकीस

author img

By

Published : Aug 20, 2023, 2:35 PM IST

Updated : Aug 20, 2023, 10:40 PM IST

नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सैन्यदलातून हकालपट्टी करण्यात आलेल्या चौधरीला खारघर पोलिसांनी अटक केलीय. याआधी चौधरीनं 7 महिलांशी लग्न केले होते. स्वतःला सैन्यदलाचा मोठा अधिकारी म्हणवून घेत त्याने 7 महिलांना फसवून त्यांच्याशी लग्न केलं होतं.

7 महिलांशी लग्न करणारा लष्करी अधिकारी अटकेत
7 महिलांशी लग्न करणारा लष्करी अधिकारी अटकेत

ठाणे : लष्कर अधिकारी असल्याची बतावणी करुन 7 महिलांशी लग्न करणाऱ्या सैन्यदलातील लखोबा लोखंडेला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. चौधरी असे या लखोबा लोखंडेच नाव आहे. लष्करातून कोर्ट मार्शल झाल्यानंतरही महिलांना सैन्यदलात अधिकारी असल्याचं भासवून त्याने तब्बल 7 महिलांशी लग्न केली आहेत. या 7 महिलांपैकी एकीने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली त्यानंतर या लखोबा लोखंडेचा पराक्रम जगासमोर आलाय.

झालं होतं कोर्ट मार्शल : आरोपी चौधरी हा आधी सैन्यदलात नोकरीला होता. 2017 मध्ये सैन्यदलाने चौधरीला कोर्ट मार्शल करून काढून टाकले होते. चौधरी हे सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होता. मात्र वर्षभर चौधरी हा त्याच्या ड्युटीवर हजर नव्हता आणि कोणालाही काहीही न कळवता तो अचानक गायब झाला होता. त्याच्याशी संपर्क होत नसल्यानं लष्कराने त्याला 2017 मध्ये सेवेतून काढून टाकलं.

फसवणुकीचा गुन्हा दाखल : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमत सिंग चौधरी (वय ३४) हा मूळचा उत्तर प्रदेशमधील अलिगढचा आहे. या आरोपी विरोधात खारघर पोलीस ठाण्यात १७ ऑगस्टला घरगुती हिंसाचार आणि फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीड वर्षांपेक्षा जास्त काळ सुट्टीवर गेल्याने लष्करातून चौधरीचे कोर्ट मार्शल करण्यात आले होते. या आरोपी व्यक्तीने भारतीय लष्कराचा गणवेश, विविध प्रशस्तीपत्रे आणि संरक्षणाचे कौतुक प्रमाणपत्रही बनावट बनवली आहेत, ते सर्व पोलिसांनी हस्तगत केले आहे.

महिलांना फसवलं : चौधरी हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.लष्कारात कोर्ट मार्शल झाल्यानंतर त्याने नवी मुंबईतील एका रेस्टॉरंट बारमध्ये चौकीदार म्हणून काम करू लागला. त्यादरम्यान चौधरीने सोशल मीडियावर स्वत:चा एक प्रोफाईल तयार केला. ज्यामध्ये त्याने स्वत:ला सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी पुणे, दिल्ली, नवी मुंबई व इतर काम केले असल्याचं सांगितलं. त्याचा प्रोफाईल पाहिल्यानंतर अनेक महिला त्यांच्याशी जवळीक करायचा. याचा फायदा घेत चौधरीनं शहरांतील श्रीमंत स्त्रिया हेरून त्यांच्याशी लग्न केलं.

एका पत्नीची तक्रार : चौधरीसोबत लग्न केलेल्या एका महिलेला चौधरीचा संशय आला. ही महिला नवी मुंबईत राहत होती. संशय आल्यानंतर तिने त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर चौधरीने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात अडकवल्याचे महिलेच्या लक्षात आले. सत्यता समोर आल्यानंतर तिने याबाबत पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर चौधरीचा पराक्रम पाहून पोलीसही चक्रावले.

पाकिस्तानात प्रशिक्षण : सैन्यदलातील अधिकारी असल्याचं सांगून चौधरीनं 7 महिलांशी लग्न केली आहेत. याचा तपास करत असताना पोलिसांना चौधरीकडे एक डायरी सापडलीय. यात त्याने कोड वर्डमध्ये बीएआरसी आणि इतर संवेदनशील ठिकाणांची माहिती लिहिलीय. यामुळे या प्रकरणाचा तपास इंटेलिजन्स ब्युरो आणि एटीएसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपास यंत्रणांसमोर चौधरीने सांगितले की त्याने पाकिस्तानात जाऊन दीड महिन्याचे प्रशिक्षण घेतलंय. यामुळे इंटेलिजन्स ब्युरो, एटीएस चौधरीच्या या सर्व गोष्टींमध्ये किती तथ्य आहे याची पडताळणी करत आहे. हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी संबंधित असल्याने तपासातील माहिती लीक होऊ नये म्हणून मोठी काळजी घेतली जात आहे. संशयास्पद कागदपत्रे, बीएआरसीची माहिती आणि इतर काही संवेदनशील ठिकाणे सापडली आहेत.

हेही वाचा-

  1. Thane crime: सोडचिठ्ठी देण्यापूर्वीच पत्नीला अचानक संपविले..फरार पतीला अटक
  2. Poisoning On Husband : कलीयुगी पत्नीचा प्रताप! इंजिनियर पतीसह सासूवर विषप्रयोग करून जीवे मारण्याचा प्रयत्न
Last Updated :Aug 20, 2023, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.