ETV Bharat / state

Thane crime: सोडचिठ्ठी देण्यापूर्वीच पत्नीला अचानक संपविले..फरार पतीला अटक

author img

By

Published : Aug 20, 2023, 1:10 PM IST

पतीने चारित्र्याच्या संशयावरून पतीने १८ ऑगस्टला हत्या केली. ही घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे गुन्हे न्यूज
Thane crime

ठाणे : चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर लोखंडी पहारने हल्ला करून पत्नीला जागीच ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या चाँदरोटी गावात घडली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर पती फरार झाला होता. पोलिसांनी या आरोपीला अटक केली. योगेश पांडुरंग जागले (वय. ४० रा. चाँदरोटी) असे आरोपीचे नाव आहे. दीपाली (वय ३०) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. महिलेच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीवरून हल्लेखोर पती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर पती योगेश हा शहापूर तालुक्यातील चाँदरोटी गावात मृतक पत्नी दीपाली सोबत राहत होता. विवाह झाल्यानंतर काही वर्ष सुखी संसार दोघांचा सुरू असतानाच २०२० साली आरोपी हल्लेखोर पतीने पत्नी दीपालीच्या चारित्र्याच्या संशय घेतला होता. त्यावेळी दोघांमध्ये वाद होऊन आरोपी पतीने मृतक पत्नीला सोडचिठ्ठी देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, दोन्ही कुटुंबानी सोडचिठ्ठीच्या विषयाचा पुढाकार घेऊन दोघांमधील वाद मिटवला होता.

लोखंडी पहारने हल्ला करून केले ठार- काही महिन्यानंतर पुन्हा हल्लेखोर पतीच्या डोक्यात पत्नीच्या चारित्र्याच्या संशयाचे भूत डोक्यात शिरले होते. त्यातच १८ ऑगस्ट शुक्रवारी दुपारच्या सुमारास मृतक पत्नी आणि आरोपी पती घरात असतानाच दोघांमध्ये पुन्हा त्याच कारणावरून वाद झाला. मात्र यावेळी हा वाद एवढा विकोपाला गेला की, १८ ऑगस्टला सायंकाळी चार वजल्याच्या सुमारास घरातील लोखंडी पहारने पत्नीवर हल्ला करून तिला जागीच ठार मारले. त्यानंतर घटनास्थळावरुन हल्लेखोर पती फरार झाला.


आरोपीला अटक- दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत दीपालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर मधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. त्यानंतर १९ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास मृतकचे नातेवाईक गणेश तळपाडे (वय ३४ रा. गोंदी , घोटी जिल्हा नाशिक ) यांच्या तक्रारीवरून हल्लेखोर पती योगेशवर हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपीला अटक केल्याची माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली आहे.

हेही वाचा-

  1. Old Man Murder Case Mumbai: वृद्धाची हत्या करून २ कोटींचा ऐवज लुटला; पोलिसांनी 'ही' युक्ती वापरून लावला शोध
  2. Nashik Murder Case : 'लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.