ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृह पुन्हा बंद करण्याचे आदेश

author img

By

Published : Jul 1, 2021, 5:31 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत सुरू झालेले मॉल, शॉपिंग सेंटर, सिनेमागृह व नाट्यगृह पुन्हा बंद करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे.

नवी मुंबई
नवी मुंबई

नवी मुंबई - नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होताच नवी मुंबईत मॉल शॉपिंग सेंटर, सिनेमागृहे, नाट्यगृहे टाळेबंदीनंतर खुली करण्यात आली होती. मात्र, ती आता पुन्हा बंद करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बंद करण्याचे आदेश

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मार्च महिन्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली होती. एप्रिल महिन्यात तर एका दिवसात रुग्णसंख्येचा उच्चांक 1 हजार 700 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. तसेच राज्यात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर शहराती मॉल शॉपिंग सेंटर, नाट्यगृह, सिनेमागृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले होता. मात्र, कोरोनाची रूग्ण संख्या कमी झालेली पाहता 11 जूनला नियम पाळून हे मॉल, शॉपिंग सेंटर, नाट्यगृह सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने खुली करण्यास मुभा देण्यात आली. मात्र, शहरातील निर्बंध हटवल्यानंतर नागरिक नियमांचे उल्लंघन करून गर्दी करत होते. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. परिणामी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मॉल शॉपिंग सेंटर, नाट्यगृह, सिनेमागृह पूर्णपणे बंद करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.

बांधकाम साईट्स सुरू राहणार

नवी मुंबई शहरातील ज्या बांधकाम साईट्सवर मजूर राहण्याची सोय असेल, अशा ठिकाणचे बांधकाम सुरू राहील. ज्या बांधकामाच्या ठिकाणी मजूर बाहेरून येत आहेत तर त्या ठिकाणी फक्त संध्याकाळी 4 वाजेपर्यंत काम सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने घेण्यात येत आहे खबरदारी

नवी मुंबई शहरात निर्बंधात शिथिलता केल्यानंतर नागरिक खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून मॉल, शॉपिंग सेंटर, शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृह नाट्यगृह पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी व त्यांची अंमलबजावणी नीट व्हावी म्हणून नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालये व महापालिका मुख्यालयाकडून काटेकोर लक्ष देण्यासाठी विशेष दक्षता पथकांची नेमणूक करण्यात येत आहे.

पालिका क्षेत्रात टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात येत आहे

डेल्टा प्लस संक्रमण पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट क्षेत्रातील कोरोनाग्रस्त रुग्ण शोधून, त्यांचे विलगीकरण करून, त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. मॉल बंद करण्याचे आदेश दिल्याने तेथे टेस्टींग होणार नाही. मात्र, बस डेपो व मार्केट परिसरात चाचण्या सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.

हेही वाचा - नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नेपाळला जाण्याच्या तयारीतील आरोपी गजाआड

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.