ETV Bharat / state

अधिकाऱ्याच्या पोराचा प्रताप; किरकोळ वादातून प्रेयसीला कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न, पीडिता गंभीर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 9:58 AM IST

Updated : Dec 16, 2023, 6:45 PM IST

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

Lover Tried to Kill his Girlfriend : प्रियकरानं आपल्या प्रेयसीला किरकोळ वादातून कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. कारखाली चिरडल्यानं ही पीडिता गंभीर जखमी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीचे वडील हे उच्च पदावर कार्यरत आहेत.

अमरसिंग जाधव उपायुक्त ठाणे पोलीस

ठाणे Lover Tried to Kill his Girlfriend : प्रेयसीसोबत झालेल्या किरकोळ वादातून प्रियकरानं तिच्या अंगावर कार घालून चिरडून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडलीय. अश्वजीत गायकवाड असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ओवळा भागात ही घटना घडली. अश्वजीतनं त्याच्या मित्रांच्या मदतीनं हा हल्ला केल्याचा आरोप त्याच्या प्रेयसीनं केलाय. सध्या तरुणीवर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अश्वजीतसह तीन जणांवर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नुकताचं प्रदर्शित झालेला अ‍ॅनिमल सिनेमात ज्याप्रकारे त्यातील पात्र क्रुरपणे वागतो, तसाच हा प्रकार असल्याच दिसून येतंय.

नेमकं काय घडलं : अश्वजीतची प्रेयसी उच्चशिक्षित असून घोडबंदर इथं राहते. अश्वजीत गायकवाडनं तिला सोमवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास ओवळा येथील एका हॉटेलजवळ भेटायला बोलावलं. तिथं त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. यानंतर अश्वजितनं प्रेयसीला शिवीगाळ करुन जबर मारहाण केली. तसंच तिच्या डाव्या हाताला चावाही घेतल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. त्यानंतर अश्वजितनं त्याच्या मित्रांना तिला कारनं उडवून टाका असं सांगताच त्याचे मित्र रोमील पाटील आणि सागर शेळके यांनी तिच्या अंगावर कार घालून तिला चिरडलं, असा आरोप पीडितेनं केला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. तिनं आपल्या सोशल मीडियावरुन प्रियकर अश्वजीत गायकवाडनं जीवघेणा हल्ला केल्याची पोस्ट केली. यानंतर ही घटना उघडकीस आली.

पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे मदत मिळत नसून, पोलीस जबाब बदलायला सांगत आहेत. आरोपींमध्ये आणखीन एक पोलिसांचा मुलगा असल्यामुळं पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मदतीसाठी मी ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेयर केली व त्यानंतर पोलिसांनी दखल घेतली - पीडित तरुणी

11 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. पीडित आणि संशयित आरोपी यांच्यात वाद झाला. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सविस्तर तपास सुरू आहे - अमरसिंग जाधव, उपायुक्त, ठाणे पोलीस

प्रेयसीला कारखाली चिरडलं

पोलिसांकडून कारवाई नाही : सदर घटनेचा गुन्हा कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला असून पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे अश्वजीत गायकवाड हा ठाण्यातील अनेक प्रमुख नेत्यांशी राजकीय दृष्ट्या जोडलेला असून त्याचे वडील अनिलकुमार गायकवाड हे एमएसआरडीसीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अद्यापही अश्वजीत आणि त्याच्या मित्रांवर कोणतीही कारवाई केली नसल्यानं त्यांच्या पदाचा दबाव पोलिसांवर आहे का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

पीडितेच्या वकिलांची प्रतिक्रिया : मी पीडितेला भेटले, तिची प्रकृती सध्या स्थिर आहे पण जखमा खूपच गंभीर आहेत. दुखापतींनुसार 307 (IPC) ची नोंद व्हायला हवी होती, जी नोंद झालेली नाही. कलम 307 आणि 356 नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही पोलीस अधिकाऱ्याकडं करत आहोत. परंतु, त्याची दखल घेतली नाही. याची दखल न घेतल्यास आम्हाला उच्च न्यायालयात जावे लागेल, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वकील दर्शना पवार यांनी दिली.

हेही वाचा :

  1. कोरोनाच्या काळात लैंगिक शोषण, २ वर्षानंतर जबाब घेऊन तिघावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
  2. बालकांची तस्करी प्रकरण: अडीच लाखात विकलं होतं मूल, गुन्हे शाखेनं आणखी तीन महिलांना केली अटक
Last Updated :Dec 16, 2023, 6:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.