ETV Bharat / state

कोरोनाच्या काळात लैंगिक शोषण, २ वर्षानंतर जबाब घेऊन तिघावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 9:35 AM IST

Mumbai Crime News
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; पोक्सो कायद्याअंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Crime News : 2021 मध्ये एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणी आता तिघांविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुंबई Mumbai Crime News : आई नाईट ड्युटीवर गेलेली असताना एका 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना 2021 मध्ये घडली. या घटनेनंतर पीडित मुलगी नैराश्यावस्थे गेली. त्यामुळं मागील दोन वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळं याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात आली नाही. मात्र, आता पीडितेनं आपला जबाब नोंदवल्यानंतर मुंबईच्या कुर्ला परिसरातील विनोबा भावे पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काय आहे प्रकरण : पीडिता दहावीत शिकत असताना तिची आई नाईट ड्युटी करायची. त्यामुळं पीडितेच्या आईची मैत्रीण त्यांच्या घरी झोपायला यायची. काही दिवसांनंतर आईची मैत्रीणीची अजून एक मैत्रीणही तिथं झोपायला येऊ लागली. तसंच यापैकी एकीचा प्रियकरही तिथे येऊ लागला. पीडित मुलीनं तक्रारीत म्हटलंय की, या दोन्ही महिला तिला खायला द्यायच्या अन् बळजबरीनं शीतपेय पाजायच्या. त्यानंतर पीडितेला गुंगी यायची. एका दिवशी सकाळी उठल्यावर पीडितेच्या लक्षात आलं की तिच्यासह काहीतरी अनैतिक घडतंय.

झोपी गेली असताना लैंगिक अत्याचार- पीडिता तिच्या आईसह गावी गेली. मात्र, दहावीची परीक्षा असल्यामुळं तिच्या आईनं तिला मुंबईला परत पाठवलं. पीडिता घरी एकटीच असल्याचं पाहून दोन्ही महिला पुन्हा तिच्या घरी आल्या. यावेळी त्यांनी पीडितेला पुन्हा एकदा शीतपेय पाजले. त्यानंतर त्यांनी पीडितेवर एका पुरुषासोबत संबंध ठेवण्यास दबाव टाकला. पण पीडितेनं यासाठी नकार दिला. त्यानंतर पीडिता झोपी गेली असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.


तपास सुरू : एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, पीडिता निराशेत गेल्यानं तिच्यावर दोन वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. पीडित तरुणी आता 18 वर्षांची आहे. पण ही घटना घडली तेव्हा ती 16 वर्षांची होती. म्हणून पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यासह भारतीय दंड संविधान विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा -

  1. बालकांची तस्करी प्रकरण: अडीच लाखात विकलं होतं मूल, गुन्हे शाखेनं आणखी तीन महिलांना केली अटक
  2. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला; घराच एकटी असताना केला वार
  3. तीन वर्षाच्या बाळाचं तरुणीनं केलं अपहरण; मुंबई पोलिसांनी ठोकल्या तिकडीला बेड्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.