ETV Bharat / state

खंडणीसाठी मित्रानेच केले बालकाचे अपहरण; मुंब्रा पोलिसांनी केली बालकाची सुखरुप सुटका

author img

By

Published : Jul 12, 2019, 5:55 PM IST

Updated : Jul 12, 2019, 7:05 PM IST

जवळच्या मित्रानेच दीड वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपीस मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिटने अटक केली असून बालकाची सुखरुप सुटका केली आहे.

मुंब्रा पोलिसांनी केली बालकाची सुखरुप सुटका

ठाणे - जवळच्या मित्रानेच दीड वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपीस मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिटने अटक केली असून बालकाची सुखरुप सुटका केली आहे.

खंडणीसाठी मित्रानेच केले बालकाचे अपहरण

मोनूकुमार नंदकिशोर पासी हे दिव्यात राहतात. त्यांना आकाश हा दीड वर्षाचा मुलगा आहे. 6 जुलैला सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मोनूकुमार यांचा लहान भाऊ अवधेशकुमार व त्यांचा मित्र आरोपी नागेश पासी हे आकाशला सोबत घेवून फिरायला बाहेर निघाले. रस्त्याने जात असताना आरोपी नागेशने एका दुकानासमोर बॅग ठेवली असल्याचे अवधेशकुमारला सांगितले. ती बॅग अवधेशला आणायला सांगितली. अवधेशकुमार ती बॅग आणायला गेला असता त्याला बॅग मिळाली नाही. आणि परत आला तेव्हा आकाश आणि नागेश दोघेही दिसले नाही. त्यामुळे अवमेधकुमारने त्यांचा आसपास शोध घेतला पण ते कुठेच मिळाले नाही. आरोपी नागेश हा खंडणी मागण्याच्या मनस्थितीत असल्याने त्याने आकाशचे अपहरण केले.

यादरम्यान पासी कुटूंबियांनी लगेच मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नागेशवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तांत्रिक तपास पोलीस करत होती. दरम्यान अपहरणकर्ता नागेश पासी याने आपल्या मोबाईलवरून १७ जुलै रोजी उत्तरप्रदेश येथे राहणारा चुलत भाऊ लवकुश पासी याला मुलाच्या सुटकेसाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. आरोपी नागेश पासी याच्या फोनवर पोलिसांचे लक्ष होते. मात्र खंडणीच्या फोन नंतर पोलीस सतर्क झाले. खबऱ्याच्या माहितीच्या आधारे अपहृत बाळ हे पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे असल्याचे निष्पन्न झाले.

मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट १ चे संयुक्त पथक यांनी बोईसर परिसराचा शोध घेतला. १२ जुलै रोजी आरोपी नागेश रामअगार पासी (वय २३) अटक केली. त्याने अपहरण केलेल्या आकाश याची सुखरूप सुटका कारण्यात आली. चिमुरडा आकाश याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तर आरोपी नागेश पासी याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली. पुढील तपास मुंब्रा पोलीस करीत आहेत.

Intro:बाळाची सुखरूप पालघरमधून सुटका.....मुंब्रा पोलीस-गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई खंडणीसाठी दीड वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अटकBody:

दिव्यात राहणाऱ्या मोनूकुमार नंदकिशोर पासी यांच्या दीड वर्षाच्या चिमुरड्याने खंडणीसाठी त्याच्याच भाऊबंदकीने केले. या प्रकरणी आरोपी नागेश पासी मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा ६ जुलै, २०१९ रोजी दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट १ द्वारे संयुक्तरित्या करण्यात येत होता. पोलीस पथकाने पालघर जिल्ह्याच्या बोईसर परिसरातून आरोपी नागेश पासी याला अटक करीत बालकाची सुखरूप सुटका केली.

६ जुलै, २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमर्स फिर्यादी यांचा लहान भाऊ अवधेशकुमार व त्याचा मित्र आरोपी नागेश पासी दोघे दीड वर्षाचा आकाश याला फिरण्यास घेऊन गेले. अवधेश याचा मित्र नागेश याने बॅग समोरच्या दुकानात ठेवली असल्याचे सांगत ती घेऊन ये असे सांगून आकाशला ताब्यात घेतले. अवधेशला बॅग मिळाली नाही. दरम्यान नागेश पासी याने मुलाचे अपहरण करून पोबारा केला. मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखा संयुक्तरित्या तपास करीत होते. त्याच दरम्यान पोलीस पथकाला अपहरणकर्ता नागेश पासी याने आपल्या मोबाईलवरून १७ जुलै रोजी उत्तरप्रदेश येथे राहणारा चुलत भाऊ लवकुश पासी याला फिर्यादीच्या मुलाच्या सुटकेसाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. गुन्ह्याचा तांत्रिक तपस पोलीस करीत होते. आरोपी नागदेश पासी याच्या फोनवर पोलिसांचे लक्ष होते. मात्र खंडणीच्या फोन नंतर पोलीस सतर्क झाले. खबऱ्याच्या माहितीच्या आधारे अपहृत बाळ हे पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे असलयाचे निष्पन्न झाले. मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट १ चे संयुक्त पथक यांनी बोईसर परिसराचा शोध घेत १२ जुलै रोजी आरोपी नागेश रामअगार पासी(२३) याला अटक केली. त्याने अपहरण केलेल्या आकाश याची सुखरूप सुटका कार्नाय्त आली. चिमुरडा आकाश याला पालकांच्या तर आरोपी नागेश पासी याला मुंब्रा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन कार्नाय्त आले. पुढील तपस मुंब्रा पोलीस करीत आहेत.
Byte विवेक फनसळकर पोलीस आयुक्त ठाणेConclusion:
Last Updated : Jul 12, 2019, 7:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.