ETV Bharat / state

High pressure Air Pipe Inserted into Anus: हायप्रेशर हवेचा पाईप गुदव्दारात घुसवल्याने कामगार गंभीर; प्रकार सीसीटीव्हीत कैद....

author img

By

Published : Aug 6, 2022, 9:34 AM IST

Updated : Aug 6, 2022, 11:21 AM IST

अंबरनाथ शहरातील वडोळ गाव भागात एका कंपनीत गुरुवारी रात्रीपाळीला एक कामगार कामावर आला. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा कामगार कंपनीतच एका मशीनवर काम करीत होता. त्यावेळी त्याचा एक सहकारी कामगार मित्र तिथे आला (High pressure Air Pipe Inserted into Anus). त्याने मस्करी म्हणून हवेचा हायप्रेशरचा पाईप त्या कामगाराच्या गुदव्दारात ( Putting a Pipe in Anus ) घातला. यामुळे ही हायप्रेशरची हवा कामगाराच्या आतड्यांमध्ये शिरल्याने ( Worker is Critical ) तो क्षणार्धात खाली ( Incident Caught on CCTV ) कोसळला.

Vadol Village Area of ​​Ambernath colleague in the company
अंबरनाथ शहरातील वडोळ गाव कंपनी

ठाणे : सहकारी कामगार मित्राची मस्करी एका सहकारी कामगाराच्या जीवाशी आल्याची घटना समोर आली आहे. कंपनीतील सहकारी कामगार मित्राने या कामगाराच्या गुदव्दारात हायप्रेशरचा हवेचा पाईप घुसवल्याने ( Putting a Pipe in Anus ) त्या कामगाराच्या पोटातील आतड्याला गंभीर ( Worker is Critical ) दुखापत झाली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील वडोळ गाव परिसरातल्या एका कंपनीत घडली आहे. तर गुदव्दारात पाईप लावत असतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली ( Incident Caught on CCTV ) आहे.

अंबरनाथ शहरातील वडोळ गाव कंपनी

थट्टा मस्करीत हवेचा प्रेशर पाईप घातला गुदद्वारात : अंबरनाथ शहरातील वडोळ गाव भागात एका कंपनीत हा जखमी कामगार काम करतो. गुरुवारी रात्रीपाळीला तो कामावर आला होता. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा कामगार कंपनीतच एका मशीनवर काम करीत होता. त्यावेळी त्याचा एक सहकारी कामगार मित्र तिथे आला. त्याने मस्करी म्हणून हवेचा हायप्रेशरचा पाईप त्या कामगाराच्या गुदव्दारात घातला (High pressure Air Pipe Inserted into Anus). यामुळे ही हायप्रेशरची हवा कामगाराच्या आतड्यांमध्ये शिरल्याने तो क्षणार्धात खाली कोसळला. त्यावेळी इतर कामगार मित्रांनी त्याला उचलून तत्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या या कामगारावर उपचार सुरू आहेत.

कामगाराची प्रकृती चिंताजनक : दरम्यान, या कामगाराची प्रकृती चिंतानजक असल्याने तातडीने ऑपरेशन करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. जखमी कामगाराच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. ज्या कामगाराने ही मस्ती केली आहे, त्याच्यावर पोलीस कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून पोलीससुद्धा चक्रावले आहेत.

पोलिसांकडून तत्काळ हालचाल : माहिती मिळताच पोलिसांनी थेट रुग्णालयात दाखल असलेला पीडित कामगाराची भेट घेतली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेचे नेमकं कारण काय असू शकते, याचा तपास सध्या पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी सुरुवातीला रुग्णालयात आणि नंतर कंपनीत जाऊन चौकशी केली. तर या तरुणाने हा प्रकार मस्तीत घडला असल्याचे सांगितले असून, आपल्याला कोणतीही तक्रार करायची नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र, या प्रकारामुळे आपली मस्ती एखाद्याच्या कशी जीवावर बेतू शकते, हे समोर आले आहे.

हेही वाचा : Cabinet expansion will be done soon: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार

Last Updated : Aug 6, 2022, 11:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.