ETV Bharat / state

Heavy Rain : भिवंडीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत ; सर्वत्र पूरस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला

author img

By

Published : Jun 29, 2023, 1:58 PM IST

Updated : Jun 29, 2023, 2:55 PM IST

राज्यात मान्सून सक्रिय झाला असून विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईतही जोरदर पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. भिवंडी शहरालगतच्या कामवारी नदीसह वारणा नदीची पातळीही पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

भिवंडीत मुसळधार पाऊस
भिवंडीत मुसळधार पाऊस

भिवंडीत मुसळधार पाऊस

ठाणे : जिल्हात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका भिवंडीला बसला आहे. भिवंडी शहरासह ग्रामीणमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने आज अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पाऊस संततधारेसह मुसळधारपणे कोसळत राहिल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. भिवंडी शहरालगतच्या कामवारी नदीसह वारणा नदीची पातळीही पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तर भिवंडी पारोळ रोडवरील कांबे गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पाऊसाचा जोर कायम राहिल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

या गावांचा संपर्क तुटला : जुनांदुर्खी ,कांबे ,टेंभवली,पालीवली ,गाणे ,फिरिंगपाडा ,लाखीवली ,चिंबीपाडा ,कुहे ,आंबरराई ,कुहे ,खडकी ,भुईशेत ,माजिवडे ,धामणे ,वाण्याचा पाडा आदी गावांचा भिवंडी शहराशी संपर्क तुटला आहे. भिवंडी शहरातील निजामपूरा,कणेरी,कमला हॉटेल,नारपोली,पद्मानगर, तीनबतती, शिवाजीनगर भाजीमार्केट, नझराना कंपाऊंड ,नदीनाका अशा सखल भागात पाणी साचल्यामुळे दुकानदार आणि रहिवाशांचे हाल होत आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याणरोड,अंजूरफाटा,रांजणोली बायपास नाका,वंजारपटी नाका,नारपोली व शेलार ,माणकोली ,वडपे बायपास नाका अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर बुधवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर तब्बल १० तास वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना व वाहनचालकांना वहातूक कोंडीचा सामना करावा लागला. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील वारणा ,कामवारी ,तानसा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने तहसीलदार अधिक पाटील यांनी नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसाचा ऑरेंज अलर्ट : राज्यात मान्सू सक्रीय असून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. आज कोकणसह पश्चिम महराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान पावसामुळे अनेक ठिकाणच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पालघर जिल्ह्यामध्येही तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे.

हेही वाचा -

  1. Heavy Rainfall Alert : मध्य महाराष्ट्र, गोवा गुजरातला मुसळधार पावसाचा इशारा, झाड कोसळल्याने पावसाळ्यात तिसरा मृत्यू
  2. Maharashtra Weather Update: ठाणे, रायगड, रत्नागिरीला आयएमडीचा ऑरेंज अलर्ट, राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज
  3. Maharashtra Weather Update: येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रासह मध्यभारतात मुसळधार पाऊस... हवामान विभागाचा इशारा
Last Updated : Jun 29, 2023, 2:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.