ETV Bharat / state

Thane Crime News : धक्कादायक! तृतीयपंथीयावर बंद खोलीत सामूहिक अनैसर्गिक अत्याचार; आरोपी फरार

author img

By

Published : Jan 7, 2023, 7:03 PM IST

Updated : Jan 7, 2023, 7:12 PM IST

Gang Rape In Thane
Gang Rape In Thane

तृतीयपंथीवर सामूहिक (Transgender Gang Rape Thane) अनैसर्गिक अत्याचार ( Unnatural torture ) केल्याची धक्कादायक घटना ( Transgender gang rape in Thane ) ठाण्यात घडली आहे. या प्रकरणी दोन नराधमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहाल सलीम खान (वय २३), शाहिद (वय २५) असे गुन्हा दाखल झालेल्या नरधमांची (Thane Crime News) नावे आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.



ठाणे : एका खोलीत नेऊन बेदम मारहाण (Transgender Gang Rape Thane) करत दोघा नराधमांनी १९ वर्षीय तृतीयपंथ्यावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार ( Unnatural torture ) केल्याची धक्कादायक घटना ( Third gender gang rape in Thane ) समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील आजदनगर परिसरात असलेल्या एका खोलीत घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर (Thane Crime News) पोलीस ठाण्यात दोन नराधमांवर अनैसर्गिक ( Unnatural torture ) अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहाल सलीम खान (वय २३) आणि शाहिद (वय २५) असे गुन्हा दाखल झालेल्या नरधमांची नावे आहेत.

तीयपंथ्यावर बळजबरीने अनसैर्गिक अत्याचार - सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार १९ वर्षीय पीडित तृतीयपंथी भिवंडीत राहते. तर दोन्ही नराधमही त्याच परिसरात राहत असल्याने पीडित ओळखत होती. त्यातच ६ जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पीडित तृतीयपंथी घरानजीक असलेल्या किराणा दुकानात दूध, अंडी पाव , आण्यासाठी गेला असता, त्या ठिकाणी परिसरात राहणाऱ्या दोघा नराधमाने दारू पिण्यासाठी पीडितला आग्रह केला. त्यानंतर नराधमाने तुझ्याकडे आमचे काम आहे असे, बोलून पीडितला नराधम शहीद याने त्याच्या खोलीत घेऊन आला. त्यानंतर खोलीचा आतून दरवाजा बंद करून पुन्हा पीडितला दारू पिण्यास आग्रह केला. मात्र पीडितने नकार देताच दोन्ही नराधमांनी बेदम मारहाण करून पीडित तृतीयपंथ्यावर बळजबरीने तीन ते चार तास अळीपाळीने अनसैर्गिक अत्याचार केले.

दोन्ही नराधमांविरोधात गुन्हा - अनसैर्गिक अत्याचार केल्यानंतर आज पहाटे चार वाजल्याच्या सुमारास पीडितला खोली बाहेर काढले. घडलेल्या प्रकाराची कुठेही वाचता केली तर, ठार मारण्याची नराधमांनी धमकी दिली. त्यानंतर पीडित बेदम मारहाण आणि अनसैर्गिक अत्याचाराचा त्रास असाह्य झाल्याने पीडितने घडलेला प्रसंग घरच्यांना, गुरुला सांगितला. त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाणे गाठून पीडितने पोलिसांसमोर घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच दोन्ही नराधमांविरोधात, आज पहाटेच्या सुमारास भादंवि कलम ३७७, ३२४, ३४२, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीस पथकाने दोघांचा शोध सुरु केला.

Last Updated :Jan 7, 2023, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.