ETV Bharat / state

Thane Accident : मुंबई नाशिक महामार्गावर एसटी बसने चिमुरडीसह चौघांना चिरडले; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Jan 22, 2023, 4:26 PM IST

मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील कोशिंबी फाट्याजवळ रस्ता ओलंडणाऱ्या चौघांना भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघाताचा भयानक थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

Thane Accident
एसटी बस अपघात

एसटी बस अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

ठाणे : २० जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास दुचाकीस्वार जयवंत ठाकरे आणि त्याच्यासोबत मागे त्यांचे मित्र बसले होते. तर चिमुरडी जिज्ञासा जाधव आणि तिचे नातेवाईक अभिजीत जाधव हे पायी रस्ता ओलंडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याच सुमारास एसटी महामंडळाच्या भरधाव वेगाने येणाऱ्या बसने चौघांना जोरदार धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात सहा वर्षांची चिमुरडी जिज्ञासा जाधवसह अभिजीत जाधव आणि दुचाकी स्वार जयवंत ठाकरेसह इतर दोघांना एसटी बसने चिरडले. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून जिज्ञासा जाधव या सहा वर्षांच्या मुलीच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाली. तर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यामध्ये एका सहा वर्षांच्या चिमुरडीचा समावेश असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.


चिमुरडीच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट : या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली आहे. अपघातग्रस्त असलेल्या चिमुरडीच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने एसटी महामंडळ कडून दवाखान्याचा खर्च मिळावा, अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे. तर याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल साबळे यांच्याशी संपर्क साधला असता, एसटी बस चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याला नियमानुसार नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले.

वेगमर्यादा पाळणे आवश्यक: दरम्यान, एकीकडे राज्यभर वाहतूक शाखेच्या वतीने ठिकठिकाणी रस्ते अपघात अभियान अंतर्गत जनजागृती सुरू आहे. विशेष म्हणजे, शासकीय वाहनचालकांमध्ये यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनाचा वेग आणि वाहन चालवताना घेण्यात येणारी दक्षता यावर जनजागृती केली जात आहे. या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आल्याने महामार्गावर वाहन चालवताना वेगाची मर्यादा नियंत्रणात असणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Jharkhand Crime : हृदयद्रावक ! झोका खेळू म्हणत.. मुलाची हत्या करून आईची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.